-
धमतरी (छत्तीसगड) येथील धर्मजागरण समन्वय विभाग आणि धर्मसेना यांची संयुक्त धर्मसभा
-
हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेचा सहभाग
धमतरी (छत्तीसगड) : लव्ह जिहाद ही समस्या वाढत आहे. याविषयी आणखी जनजागृती करणे आवश्यक आहे. भारतातील हिंदू जातीजातीत विभागले गेले होते; परंतु अयोध्येतील श्रीराम मंदिराचा विषय उपस्थित झाल्यापासून सर्व हिंदू एक होत आहेत. ते जात-पात, संप्रदाय विसरून हिंदु म्हणून एकाच ध्येयाने संघटित होतांना दिसत आहेत, असे प्रतिपादन साध्वी अनादि सरस्वती यांनी येथील धर्मसभेत केले.
धर्मजागरण समन्वय विभाग आणि धर्मसेना यांच्या संयुक्त विद्यमाने धमतरी (छत्तीसगड) येथे नुकतेच धर्मसभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी व्यासपिठावर साध्वी अनादि सरस्वती यांच्यासह हिंदु जनजागृती समिती प्रणीत रणरागिणी शाखेच्या सौ. क्षिप्रा जुवेकर आणि देहली येथील हिंदु जागरणचे जितेंद्र खुराणा उपस्थित होते. या सभेला १ सहस्र ५०० हून अधिक धर्माभिमानी हिंदू उपस्थित होते.
हिंदूंच्या समस्यांवर ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव उपाय ! – सौ. क्षिप्रा जुवेकर
१०० कोटी हिंदूंच्या देशात हिंदूंच्या भावनांना मूल्य नसल्याने हिंदु धर्मावर विविध आघात होत आहेत. गोहत्या, लव्ह जिहाद, आतंकवाद यांसारख्या समस्यांमुळे हिंदूंची अवस्था बिकट झाली आहे. अशा वेळी हिंदूंच्या समस्यांवर ‘हिंदु राष्ट्र’ हाच एकमेव उपाय आहे, असे प्रतिपादन सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी केले.
क्षणचित्र
सभास्थळी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ग्रंथप्रदर्शन लावण्यात आले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात