तुळजापूर (जिल्हा धाराशिव) : येथे मार्च या दिवशी शिवजयंती साजरी करण्यात आली. या वेळी शहरातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पंचामृताने अभिषेक करून पूजन करण्यात आले. या वेळी महंत मावजीनाथ महाराज, महंत इच्छागिरी महाराज, महंत व्यंकटअरण्य महाराज, सर्वश्री शिवसेनेचे सुधीर कदम, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संजय सोनवणे, हिंदु जनजागृती समितीचे अमित कदम, मंडप व्यापारी बाळासाहेब शिंदे यांसह ५० हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.
या वेळी श्री. अमित कदम यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे आपण सर्व हिंदूंनी राष्ट्र आणि धर्म कार्य करूया, असे मनोगत व्यक्त केले. ध्येयमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. यानंतर राणी लक्ष्मीबाई उद्यानातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यालाही बलीदान मासानिमित्त पुष्पहार अर्पण करण्यात आला.
पंढरपूर : येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने अश्वारुढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे शहरप्रमुख श्री. प्रतापराव साळुंके यांनी प्रेरणामंत्र आणि ध्येयमंत्र म्हटले. या वेळी पेशवा युवा मंचचे श्री. गणेश लंके, हिंदु जनजागृती समितीचे श्री. शशीशेखर पाटील, हिंदु महासभेचे श्री. बाळासाहेब डिंगरे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता संदीप अपसिंगेकर यांसह अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात