मुंबई : ७ मार्च या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार साजर्या झालेल्या जयंतीनिमित्त हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मध्य मुंबईत ६ ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. तसेच सिद्धिविनायक मंदिरातील भ्रष्टाचार प्रकरणी सह्याची मोहीम राबवण्यात आली.
गावदेवी मित्र मंडळ, भांडुप (प.) आणि श्री स्वराज्य युवा प्रतिष्ठान, घाटकोपर येथे समितीचे श्री. सचिन घाग यांनी, मोरे चाळ घाटकोपर येथे श्री. विनायक साळुंखे, तर अरुणोदय मित्र मंडळ टागोरनगर विक्रोळी येथे श्री गणेश पाटील, घाटला चेंबूर येथे सौ. ममता देसाई यांनी विषय मांडला. गावदेवी मंदिर मित्रमंडळ भांडुप आणि मोरे चाळ घाटकोपर शिवसेना शाखा, संयुक्तनगर, नालासोपारा (पूर्व) येथे क्रांतिकारकांचे फ्लेक्स लावण्यात आले. विक्रोळी येथे स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. प्रात्यक्षिके पाहून तेथील एका मंडळाच्या तरुणांनी स्वसंरक्षण प्रशिक्षणवर्गाची मागणी केली. भाईंदर प. येथील युवा प्रतिष्ठान संघटनेने भाईंदर सेकेंडरी स्कूल येथे प्रथमच शिवकालिन पुरातन शस्त्रे आणि गड-किल्ले यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन केले होते. येथे युवा सेनेचे श्री. श्रेयस सावंत यांनी पुढाकार घेऊन व्याख्यानाचे आयोजन केले होते. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सागर चोपदार यांनी येथे व्याख्यान घेतले. ३० जणांनी याचा लाभ घेतला.
सिद्धिविनायक मंदिरातील विश्वस्तांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधातील स्वाक्षरी मोहिमेस उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी मुंबई : खारघर सेक्टर ८ च्या शिवसेनाप्रणित श्री साई विघ्नहर्ता मित्र मंडळाच्या वतीने आयोजित शिवजयंती कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे श्री. निलेश देशमुख यांनी, तर श्री महाकाली मंदिर, सेक्टर ११ येथील शिवसेना युवा सेना आयोजित उत्सवात सिद्धिविनायक मंदिरातील भ्रष्टाचाराचा विषय समितीचे श्री. केदार चित्रे यांनी मांडला. दोन्ही ठिकाणी या संदर्भात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली.
क्षणचित्रे
शिवसेनेचे खारघर उपविभाग प्रमुख श्री. रामचंद्र देवरे आणि उपशहर प्रमुख श्री. सुहास नागोटकर यांनी ‘‘तुमचे कार्य चांगले आहे’’, असे सांगितले आणि समितीचे श्री. संतोष मांडोळे यांचा शाल आणि शिवप्रतिमा देऊन सत्कार केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात