काटगाव (जिल्हा धाराशिव) : सध्याच्या सामाजिक, राष्ट्रीय आणि धार्मिक समस्यांवर केवळ एकच उपाय आहे, तो म्हणजे म्हणजे ‘हिंदु राष्ट्रा’ची स्थापना. समाजजीवन सुरक्षित ठेवण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने ‘सुराज्य अभियान’ चालू केले आहे. न्यायालयात कोट्यवधी खटले प्रलंबित आहेत, विलंबाने मिळणारा न्याय हा अन्याय आहे. वैद्यकीय, शैक्षणिक, व्यवसाय या सर्वच क्षेत्रातील भ्रष्टाचार वाढला आहे. तो संपवण्यासाठी सर्वांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी येथे केले.
येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त येथील स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीन ४ मार्च या दिवशी तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री. महादेव पाटील (सर) होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. या कार्यक्रमाला २५० धर्मप्रेमी उपस्थित होते. श्री. खाडये यांच्या मार्गदर्शनानंतर येथील हिंदूंनी संघटित रहाण्याचा निर्धार केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात