शिवनी (मध्यप्रदेश) येथे श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
शिवनी (मध्यप्रदेश) : गोहत्या, धर्मांतर, लव्ह जिहाद, हिंदूंच्या धार्मिक उत्सवांवर प्रशासनाकडून लावण्यात येणारे निर्बंध आदी अनेक समस्यांमुळे आज हिंदू पीडित आहेत. देशात बहुसंख्य हिंदू असतांनाही कथित लोकराज्याकडून हिंदूंना न्याय मिळत नाही. त्यामुळे रामराज्यासमान हिंदु राष्ट्राची स्थापना केली पाहिजे. त्यासाठी हिंदूंमध्ये जागृती करणे आणि त्यांचे संघटन करणे काळाची आवश्यकता आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी येथील श्रीराम सेनेच्या पदाधिकार्यांना केले.
‘हिंदूंचे सरकार असतांनाही आज आम्हा हिंदूंना अधिकारांसाठी लढावे लागत आहे’, याविषयी श्रीराम सेनेचे महाकौशल प्रांताचे अध्यक्ष अधिवक्ता प्रमोद सोनी यांनी खंत व्यक्त केली. या वेळी व्यासपिठावर अधिवक्ता विनोद सोनी आणि श्री. राज अग्रवाल उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात