जबलपुर (मध्यप्रदेश) : येथील अधिवक्ता विबुधेन्द्र मिश्र यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांनी समितीच्या कार्याविषयी अधिवक्ता मिश्र यांना सविस्तर माहिती दिली. या वेळी अधिवक्ता मिश्र यांनी समितीच्या कार्याविषयी समाधान व्यक्त केले, तसेच ‘या कार्यात सहकार्य करण्याचा प्रयत्न करीन’, असे सांगितले. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. योगेश व्हनमारे आणि श्री. अनिल गणोरकर उपस्थित होते.
अधिवक्ता मिश्र म्हणाले, ‘‘हिंदु धर्मात सांगितल्यानुसार मी चातुर्मासात १ मास काहीही अन्न ग्रहण न करता उपवास केला. त्यावेळी मला अतिशय हलके आणि उत्साहवर्धक वाटत होते, तसेच मला सुक्ष्मगंधाची अनुभूतीही येत होती. या अनुभूतीनंतर माझी हिंदु धर्मात सांगण्यात आलेल्या सर्व गोष्टींवर दृढ श्रद्धा निर्माण झाली.’’
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात