Menu Close

श्री महालक्ष्मी मंदिराच्या परिसरात मुसलमान फकिरांचा वावर आणि अनेक नियमबाह्य गोष्टी !

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अक्षम्य दुर्लक्ष !

काही भोंदू फकीर पैसे गोळा करून ते मशिदींमध्ये देतात, ज्या मशिदींमधून हिंदूंचे अस्तित्व संपवण्याची कटकारस्थाने शिजतात, याची हिंदूंना कल्पना आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात

कोल्हापूर : पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या अंतर्गत येणारे साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असणार्‍या श्री महालक्ष्मी मंदिर परिसरात सध्या अनेक नियमबाह्य गोष्टी घडत असून या गोष्टींकडे देवस्थान समितीच्या सदस्यांना लक्ष देण्यास वेळ नाही. मंदिराच्या परिसरात सध्या मुसलमान फकिरांचा वावर असून ते सहजगत्या मंदिराच्या आजूबाजूला फिरत असतात. हे फकीर धुपाची धुरी घेऊन मंदिराच्या आजूबाजुला तो धूर परिसरातील दुकानात घालतात आणि दुर्दैवाने काही हिंदू त्यांना पैसेही देतात. (हिंदू जर अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळात होम किंवा यज्ञ करणे अशा कृती करू शकतील का ? मुसलमान फकिरांनी हिंदूंच्या मंदिरात येण्याचे कारणच काय ? देवस्थान व्यवस्थापन समितीचा याकडे होणारा काणाडोळा गंभीर असून तो मंदिराचे पावित्र्य भंग करणारा आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) 

यांसह अन्य काही गंभीर गोष्टी मंदिर परिसरात घडत आहेत

१. मंदिराच्या आत मोठी पिशवी नेण्यास अनुमती नाही. मंदिराच्या आत जातांना तपासणी यंत्रातून, तसेच विशेष सुरक्षा तपासणीतूनच जावे लागते. अनेक वेळा हे तपासणी रक्षक भाविक आले तरी निवांत गप्पा मारत बसलेले आढळतात. अनेक महिला, तसेच भाविक बिनधास्तपणे गळ्यात अडकवलेल्या मोठ-मोठ्या पिशव्या घेऊन आत जातांना आढळून येतात. सुरक्षेच्या दृष्टीने हा प्रकार अत्यंत गंभीर असून एखादा गंभीर प्रकार घडल्यावर हे सुरक्षा रक्षक जागे होणार काय, अशी स्थिती आहे.

२. मंदिर परिसरात छायाचित्र काढणे आणि ध्वनीचित्रीकरण करण्यास अनुमती नाही. तरीही येणारे भाविक परिसरात सर्रास छायाचित्र काढतांना आढळतात. येणार्‍या भाविकांनी मंदिर परिसर ‘पर्यटनस्थळ’ केल्यासारखे सर्रास ‘सेल्फी’ काढतांना आढळून येतात. मुख्य मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या मंदिरांच्या आवारात अनेक नवविवाहित जोडपी, तसेच भाविक छायाचित्र काढून घेतात आणि त्याचे ध्वनीचित्रीकरण करतात. याबाबींकडे तेथील सुरक्षा रक्षक, व्यवस्थापक, तसेच अन्य कोणाचेही लक्ष जात नाही. यामुळे मंदिर परिसराचे पावित्र्य भंग होत असून मंदिराला अनेक भाविकांनी एक ‘पिकनिक स्पॉट’ केले आहे. (धर्मशिक्षणाच्या अभाव असलेले जन्महिंदू ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *