हिंदु जनजागृती समितीची शासनाकडे मागणी
नागपूर : नागपूर रेल्वे स्थानकाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्यसरसंघचालक पू. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीच्या शिष्टमंडळाने नागपूरचे पालकमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री. चंद्रशेखर बावनकुळे यांना भेटून केली.
या संदर्भात हिंदु जनजागृती समितीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात समितीचे राज्य संघटक सुनील घनवट यांनी म्हटले आहे, नागपूर रेल्वेस्थानकाला अन्य नाव देण्यापेक्षा पू. हेडगेवार नाव देण्यात यावे; कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना प्रथम नागपूर येथे झाली. येथून राष्ट्रासाठी निःस्वार्थपणे समर्पित होण्याची विचारधारा संपूर्ण देशभर पसरली. आज समाज अन् राष्ट्र कार्य करणार्या सहस्रो संस्था, तसेच लाखो स्वयंसेवकांच्या माध्यमांतून देशभरात मोठे राष्ट्रकार्य उभे राहिले आहे. या सेवाकार्याच्या माध्यमांतून देशातील पीडित, शोषित, तसेच कोट्यवधी लोक उपकृत होत आहेत. लाखो लोकांना निःस्वार्थ कार्य करण्याची प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे नागपूर रेल्वे स्थानकाला पू. हेडगेवार यांचे नाव देणे सर्वांत उचीत आहे. समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांनी हजरत बाबा सैय्यद यांचे नाव नागपूर रेल्वेस्थानकाला दिल्यानंतर राज्यातील शेतकर्यांच्या आत्महत्या थांबतील. शेतकर्यांची भरभराट होईल, असे बालीश आणि अंधश्रद्धा पसवणारे वक्तव्य केले आहे. अशा प्रकारची नावे दिल्याने आत्महत्या थांबणार असतील, तर अशी नावे पाकिस्तानमध्ये किंवा काही मुसलमानबहुल भागांत असतांना तेथील हिंसक आणि आतंकवादी कारवाया का थांबलेल्या नाहीत ? तेथे सुख-शांतता का नांदत नाही ?
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात