Menu Close

करनाल (हरियाणा) येथे सारस्वत ब्राह्मण धर्मशाळेचे प्रमुख सुभाषचंद्र शर्मा यांची सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी घेतली सदिच्छा भेट

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हरियाणामध्ये हिंदूसंघटन संपर्क अभियान

सारस्वत ब्राह्मण धर्मशाळेच्या सदस्यांशी चर्चा करतांना (१) सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे

करनाल (हरियाणा) : येथे सारस्वत ब्राह्मण धर्मशाळेचे प्रमुख श्री. सुभाषचंद्र शर्मा आणि धर्मशाळेचे अन्य सदस्य यांची हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या वेळी त्यांनी ‘हिंदु धर्माची सध्याची स्थिती आणि ती सुधारण्यासाठी प्रत्येक हिंदूने धर्मशिक्षण घेण्याची आवश्यकता’ याविषयी मार्गदर्शन केले. याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे देहली समन्वयक श्री. कार्तिक साळुंके, समितीचे यमुना नगरचे समन्वयक डॉ. भूपेश शर्मा, तसेच सारस्वत ब्राह्मण धर्मशाळेचे अन्य सदस्य उपस्थित होते.

या वेळी डॉ. शर्मा यांनी ब्राह्मण समाजासाठी एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे ठरवले. ते म्हणाले, ‘‘आज समाजामध्ये ब्राह्मणांनी त्यांचा आदर्श निर्माण करणे आवश्यक आहे. असे केले, तरच समाज ब्राह्मणांवर विश्‍वास ठेवील. सर्व समाजाने संघटित होणे आवश्यक आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *