-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांचे विधान
-
कोरेगाव भीमा दंगलीच्या प्रकरणी विधान परिषदेत विरोधकांकडून पू. संभाजी भिडेगुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांच्या अटकेची मागणी
राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी स्वतःचे आयुष्य वेचणारे पू. भिडेगुरुजी यांच्यासारख्या ऋषितुल्य व्यक्तीमत्त्वावर असे धादांत खोटे आरोप करणे हास्यास्पद आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : ज्यांना तुम्ही मनोहर भिडे म्हणून ओळखता, त्या मनोहर भिडेगुरुजी यांनी वर्ष २००९ मध्ये गणेश चतुर्थीच्या काळात मिरज येथे दंगली पसरवल्या होत्या. (दंगली कोण भडकवतात, हे उघड असतांना त्यांना पाठीशी घालून हिंदुत्वनिष्ठांवर नाहक आरोप करणे, हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकप्रतिनिधींचा हिंदुद्वेषच होय ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्या परिसरात भिडेगुरुजी यांनी धुमाकूळ घातला होता. इतिहासाचे विकृतीकरण करायचे आणि तरुणांची माथी कशी भडकवायची हे त्यांना पुष्कळ चांगले माहीत आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार विद्या चव्हाण यांनी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्यावर विधान परिषदेत केली.
या वेळी आमदार विद्या चव्हाण पुढे म्हणाल्या, ‘‘छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतीने जोडलेले वडू बुद्रूक गाव हे पूर्वीपासून संभाजी महाराजांना मानणारे गाव आहे. हा इतिहास कुटील कारस्थान करून पालटण्याचा प्रयत्न मनोहर भिडेगुरुजी करत आहेत. वर्ष १९८० पासून ते शिवप्रतिष्ठान चालवतात.
त्यांच्या भिडेआर्मीचे तलवारधारी लोक पुण्यामध्ये वारकर्यांमध्ये तलवारी घेऊन घुसले. (प्रसंगाची योग्य ती माहिती न घेता वाटेल ते आरोप करणारे असे लोकप्रतिनिधी जनतेची दिशाभूल करत आहेत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) वारकर्यांचे प्रमुख चोपदार यांनी त्यांना चोपून काढायला हवे होते. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. तरीसुद्धा यांना अटक होत नाही. वर्ष २००९ ला ‘जोधा अकबर’ हा चित्रपट बंद पाडण्याचे कारस्थान भिडेगुरुजी यांचेच होते. अगदी पंतप्रधानांपासून त्यांना संरक्षण आहे. त्यामुळेच भिडे यांना अटक केली जात नाही. मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे ही कारस्थान करणारी दोन मंडळी आहेत. जेथे दंगल भडकवली तेथे हे दोघे कधीही उपस्थित नसतात. अमेरिकेवर जेव्हा आक्रमण झाले तेव्हा ओसामा बिन लादेन तेथे उपस्थित नव्हता; मात्र अमेरिकेच्या सैनिकांनी त्याला पाकिस्तानमध्ये घुसून मारले; पण आपल्यामध्ये ती ताकद नाही. (राष्ट्र आणि धर्म प्रेमी हिंदुत्वनिष्ठांची तुलना आतंकवाद्यांशी करणार्या विद्या चव्हाण ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात