- सामाजिक प्रसारमाध्यमांवरून होणार्या देवतांच्या अवमानाच्या विरोधात आवाज उठवणारे आमदार मंगलप्रभात लोढा आणि अन्य संघटना यांचे अभिनंदन !
- देवतांच्या विरोधातील अवमानजनक लिखाण काढण्यास ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक संकेतस्थळाला भाग पाडले ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मुंबई : ‘इन्स्टाग्राम’ या सामाजिक प्रसारमाध्यमावर हिंदूंच्या देवता श्रीगणेश, श्रीकृष्ण, तसेच जैन धर्मियांचे पूजनीय भगवान यांच्याविरुद्ध अवमानकारक टिपणी अन् धार्मिक भावना दुखावणारे लिखाण यांच्या साहाय्याने गेल्या काही कालावधीपासून चालू असलेला प्रचार बंद केला जावा, तसेच हे अवमानकारक लिखाण तात्काळ काढण्यात यावे, अशा मागण्यांसह भाजपचे आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात अनुमाने १० पेक्षा अधिक संस्थांनी शहरातील ‘इन्स्टाग्राम’च्या बीकेसी येथील कार्यालयात घोषणा देत ४ घंटे धरणे आंदोलन केले. (देवतांचा अवमानजनक प्रचार थांबवण्यात पुढाकार घेणार्यांकडून सर्वांनी शिकावे ! – संपादक) ‘इंन्स्टाग्राम’ने आक्षेपार्ह लिखाण काढल्यावर आमदार लोढा आणि अन्य आंदोलक कार्यालयातून बाहेर पडले. आमदार लोढा यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या सायबर शाखेकडे तक्रार दिली आहे.
‘ज्या देशामध्ये ‘इन्स्टाग्राम’ आणि त्याचे मुख्य माध्यम असलेले ‘फेसबूक’ हे अब्जावधी रुपयांची उलाढाल करते, त्याच देशातील धर्म आणि देवता यांच्यासंदर्भात ‘इन्स्टाग्राम’ अवमानकारक प्रचार करते, हे खेदजनक असून ते सहन केले जाणार नाही’, असे या आंदोलनाविषयी बोलतांना आमदार लोढा यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात