संयुक्त राष्ट्रांत काश्मीरचे सूत्र उपस्थित करणार्या पाकला भारताची चपराक !
पाकला शब्दांचा मार कितीही दिला तरी तो एक निर्ढावलेला देश असल्याने त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम होणार नाही. त्याला शब्दांची नाही, तर शस्त्रांचीच भाषा समजते आणि भारताकडे अशी भाषा जाणणारे आणि पाकला त्या भाषेत सांगणारे शासनकर्ते नाहीत, हे भारतियांचे दुर्दैव ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
जिनेव्हा : संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार परिषदेच्या एका बैठकीमध्ये काश्मीरचे सूत्र उपस्थित करणार्या पाकिस्तानला भारताने सणसणीच चपराक लागावली. जिहादी आतंकवादाचे पालन पोषण करणार्या देशाने भारताला शहाणपण शिकवू नये. पाकिस्तान हा एक असा देश आहे जेथे आतंकवादी उघडपणे फिरत असतात आणि पाक आम्हाला मानवाधिकारावर भाषण देत आहे. आम्हाला पाककडून लोकशाही आणि मानवाधिकार शिकवण्याची आवश्यकता नाही. पाक स्वतःच याविषयी एक अयशस्वी देश आहे, अशा शब्दांत भारताच्या अधिकारी मिनी देवी कुमाम यांनी पाकला सुनावले. या वेळी मिनी देवी यांनी पाकव्याप्त काश्मीरमधील नागरिकांवर पाककडून होत असलेल्या अत्याचारांची माहिती दिली. मिनी देवी यांनी पाकला जगातील एक अयशस्वी देश म्हणूनही पाकची हेटाळणी केली.
मिनी देवी म्हणाल्या की,
१. पाकनेच ओसामा बिन लादेन याला संरक्षणात ठेवले होते. भारतातील मुंबई, पठाणकोट आणि उरी येथील आतंकवादी आक्रमणांत पाकचा हात असल्याचे पुरावे अनेकदा पाककडे सोपवले आहेत. आक्रमणाच्या मागे असणार्यांवर पाककडून कारवाई होण्याची वाट पहात आहोत. (पाककडून आतंकवाद्यांवर कारवाईची अपेक्षा ठेवणारे मूर्ख भारतीय शासनकर्ते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
२. संयुक्त राष्ट्राने हाफिज सईद याला आतंकवादी घोषित केल्यानंतर तो उघडपणे पाक सरकारच्या संरक्षणामध्ये फिरत आहे. तसेच त्याच्या संघटनांवर बंदी घातल्यानंतरही त्याला राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. (इतके माहिती असूनही परत परत पाककडे त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे भारतीय शासनकर्ते हास्यास्पद नाहीत का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. आम्ही मानवाधिकार परिषदेला विनंती करतो की, त्यांनी पाकिस्तानला सीमेपलीकडील घुसखोरी बंद करण्यास सांगावे. आतंकवाद्यांची आश्रयस्थाने, तसेच त्यांची आर्थिक रसद पाकने बंद करावी. (भारताने सांगितले आणि संयुक्त राष्ट्राने ऐकले, असे कधी झाले आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
भारताकडून पाकचे नवीन नामकरण ‘विशेष आतंकवादी क्षेत्र’!
पाकिस्तानला आतापर्यंत भारताकडून ‘टेररिस्तान’ (आतंकवादाचे स्थान) तसेच ‘आयव्ही लीग ऑफ टेररिझम’, असे हिणवण्यात येत होते आता संयुक्त राष्ट्रांत बोलतांना मिनी देवी कुमाम यांनी पाकला एक नवीन नाव दिले. ‘एस्.टी.झेड.’ म्हणजेच ‘स्पेशल टेररिस्ट झोन’ (विशेष आतंकवादी क्षेत्र) असे नाव दिले. ज्या भागांमध्ये विशेष आर्थिक धोरणांसाठी विशेष आर्थिक क्षेत्र उभारले जाते, त्याच धर्तीवर पाकिस्तान हा ‘स्पेशल टेररिस्ट झोन’ असल्याचे मिनी देवी यांनी यातून सांगितले.
प्राचीन काळी ज्या भूमीमध्ये शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली गेली, जे शिक्षणाचे जागतिक केंद्र बनले, त्या तक्षशीलाच्या भूमीत आता ‘आयव्ही लीग ऑफ टेररिझम’ रुजली आहे, असे भारताने २ वर्षांपूर्वी संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारणसभेत ऐकवले होते. भारताने पाकिस्तानला दिलेल्या या उपाधीची जगभरातल्या प्रसारमाध्यमांनी दखलही घेतली होती. आता नवीन नावाचीही चर्चा चालू झाली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात