जळगाव : एरंडोल तालुक्यातील खेडी या गावात ३ मार्च या दिवशी ‘हिंदु धर्मजागृती सभा’ पार पडली. वेदमंत्रपठणाने सभेला प्रारंभ झाला. सौ. क्षिप्रा जुवेकर यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. श्री. प्रशांत जुवेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण केले. हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची ओळख श्री. उदय बडगुजर यांनी करून दिली, तर श्री. प्रणव नागणे यांनी सूत्रसंचालन केले. या सभेला ३०० धर्माभिमानी उपस्थित होते.
सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी ‘शौर्यजागरण’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, ‘‘लव्ह जिहाद, लॅण्ड जिहाद, फिल्म जिहाद’ यांसारखे १४ जिहाद भारतात चालू आहेत. आतंकवादाने जनता त्रस्त आहे. भारताचा शौर्यशाली इतिहास तरुणांना सांगण्याची आवश्यकता आहे. जिजामातेने धर्माचरण करून शिवरायांवर बालपणापासूनच सुसंस्कार केले, त्याप्रमाणे आजच्या प्रत्येक स्त्रीने स्वत: धर्माचरण करणे आवश्यक आहे, तरच छत्रपती शिवरायांसारखी शौर्यशाली पिढी निर्माण होईल.’’
प्रतिसाद !
१. ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेच्या कार्यात ‘साक्षीदार’ होणार कि ‘भागीदार’ असे विचारल्यावर सर्वांनी ‘भागीदार’ असे उत्स्फूर्तपणे उत्तर दिले.
२. पिंपळकोठा या गावातील काही धर्माभिमानी या सभेला उपस्थित होते. त्यांनीही त्यांच्या गावात धर्मशिक्षणवर्ग चालू करण्याची मागणी केली आहे. काही जण दैनिक सनातन प्रभातचे वर्गणीदार झाले.
क्षणचित्र
व्यासपिठाच्या दोन्ही बाजूस दोन बालक हातात भगवा ध्वज घेऊन सभा संपेपर्यंत उभे होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात