-
त्र्यंबकेश्वर येथील देवस्थान भूमी घोटाळा प्रकरण
-
नाशिक जिल्हा न्यायालयाने ३५ आरोपींचे जामीन आवेदन फेटाळले
मंदिर सरकारीकरणाचे दुष्पपरिणाम ! घोटाळा होत नाही, असे एकतरी क्षेत्र देशात आहे का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नाशिक : जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ‘कोलंबिकादेवी मंदिर ट्रस्ट आणि गंगाद्वार ट्रस्ट’च्या शेकडो एकर भूमी घोटाळा प्रकरणात कोलंबिका देवस्थानचे विश्वस्त, बांधकाम व्यावसायिक, तत्कालीन तहसीलदार, तलाठी यांसह ३५ जणांवर गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे. जिल्हा न्यायालयाने त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका आणि गंगाद्वार देवस्थान’ भूमी अपहार प्रकरणातील सर्व आरोपींचा ९ मार्चला जामीन फेटाळला. या भूमीचे मूल्य अंदाजे २०० कोटी रुपये होते. (मंदिरांचे सरकारीकरण झाल्यामुळे शिर्डी, कोल्हापूर, सिद्धीविनायक पाठोपाठ त्र्यंबकेश्वर येथील देवस्थान समितीमध्ये विश्वस्त, पदाधिकारी, शासकीय अधिकारी यांनीच कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे निदर्शनास आले आहे. यासाठी मंदिरांचे सरकारीकरण करून काही फायदा नाही, हे यातून सिद्ध होते. ही परिस्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
विशेष म्हणजे या भूमी घोटाळ्यात मंत्रालयातून घडामोडी घडल्याचा संशय आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये वाढत असलेल्या अपहाराला महसूल अधिकारी, विश्वस्त संस्था निबंधक आणि पुरातत्व विभाग उत्तरदायी असल्याचा आरोप करत महंत उदयगिरी महाराज यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या प्रकरणी म्हणणे मांडण्यासाठी शासनाला ३ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली होती.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात