केंद्रशासनाने उत्तरप्रदेशला काश्मीर होण्यापासून वाचवावे, अशीच हिंदूंची अपेक्षा आहे !
संभल (उत्तरप्रदेश) : आग्रा येथील मंटोलमध्ये सुमारे २५० हिंदू परिवारांनी येथून पलायन केले आहे. ज्या प्रकारे काश्मीरमधून हिंदूंना पलायन करावे लागले, तशी स्थिती समाजवादी पक्षाच्या उत्तरप्रदेशमध्ये आहे, अशी टीका विश्व हिंदु परिषदेच्या नेत्या साध्वी प्राची यांनी येथे केली. आग्रा येथे विश्व हिंदु परिषदेचे दलित नेते अरुण माहोर यांच्या धर्मांधाकडून करण्यात आलेल्या हत्येनंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या नातेवाइकांचे सांत्वन करण्यासाठी साध्वी प्राची येथे आल्या होत्या. त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
साध्वी प्राची पुढे म्हणाल्या की, माहोर दलित असतांनाही दलितांच्या नावाने राजकारण करणार्या बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी त्यांच्या घरी भेट दिली नाही. साध्वी यांनी राज्याचे मंत्री आझम खान यांच्यावरही टीका केली. त्यांनी आरोप केला की, खान आरोपींना सोडवण्यासाठी प्रयत्नशील असतात आणि प्रशासन त्यांना यात सहकार्य करत असते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात