नंदुरबार : येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. चव्हाण यांनी ५ मार्च या दिवशी ‘अफझलखान वधाचा फलक लावल्या’च्या कारणावरून श्री. केतन रघुवंशी यांना कलम ३५३ अन्वये अटक केली होती. अटकेत असतांनाच त्यांनी ७ मार्च या दिवशी सायंकाळी पोलीस अधीक्षकांना एक लेखी निवेदन दिले.
त्यात त्यांनी म्हटले आहे की,
१. माझ्यावर करण्यात आलेले आरोप हे केवळ सुडबुद्धीने, हेतुपरस्सर केलेले असून ते खोटे आहेत.
२. मी एक सामाजिक कार्यकर्ता आणि वृत्तवाहिनी प्रतिनिधी आहे. गावातील अवैध व्यवसाय, गोहत्या, गोतस्करी, रस्ते वाहतूक शाखेचा घोटाळा आणि जनतेची बाजू मांडतांना माझा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बुधवंत साहेब यांच्याशी वाद झाला होता. याच सुडभावनेने माझ्यावर ही कारवाई करण्यात येत आहे.
३. ज्या शिवरायांनी आपल्या सामर्थ्याने स्वराज्य घडवले त्यांचा गौरवशाली इतिहास दाखवणे आणि अफझलखान वधाचा फलक लावणे गुन्हा असेल, तर पोलीस अधीक्षक साहेबांनी तसे लेखी द्यावे.
४. गुन्हा नसेल, तर अनुमती घेतलेली असतांनाही पोलिसांनी अवैधरित्या काढलेल्या अफझलखान वधाचा फलक पुन्हा त्याच जागेवर एक दिवसाकरिता लावावा.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात