जबलपूर (मध्यप्रदेश) : हिंदूंनी प्रथम ‘हिंदु’ या शब्दाची व्याख्या समजून घेतली पाहिजे. जो हिंदु तमोगुणाच्या प्रभावामुळे व्यसन, शिव्या देणे, आई-बहिणींची छेड काढणे, यांसारखी वाईट कृत्ये करतो, तो हिंदु असू शकत नाही. तो राक्षसांच्या बाजूचा आहे. आम्हाला धर्माचे आचरण करून छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्यासारखे बनायचे आहे. तेव्हाच आम्ही स्वत:ला ‘हिंदु’ म्हणू शकतो, असे प्रतिपादन पू. अनिरुद्ध आचार्य महाराज यांनी काढले.
होलिकादहनाच्या निमित्ताने नारायणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. सीताराम सेन यांनी येथे एका सभेचे आयोजन केले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश समन्वयक श्री. आनंद जाखोटिया, श्री. योगेश व्हनमारे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. विश्वजीत सिंह आदींनी मार्गदर्शन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात