जबलपूर (मध्यप्रदेश) : ‘आज हिंदु धर्मासाठी कार्य करणार्या संघटनांमध्ये वैचारिक अधिष्ठान आणि आचरण यांचा अभाव आहे. हे अधिष्ठान देण्याचे आणि आचरण शिकवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य हिंदु जनजागृती समिती करत आहे. सध्याच्या काळात एखादी व्यक्ती साधना करून प.पू. रामकृष्ण परमहंस यांच्यासारखी उच्च अवस्था प्राप्त करू शकते, यावर माझा विश्वास नव्हता; परंतु आज गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले) यांच्या संदर्भातील अनुभूती पाहिल्यावर हे शक्य आहे, यावर माझा विश्वास बसायला लागला आहे. शास्त्रीय भाषा आणि वैज्ञानिक दृष्टीकोन यांच्या माध्यमातून तुम्ही हिंदु धर्मप्रसाराचे चांगले कार्य करत आहात, हे बघून मला आनंद झाला’, असे उद्गार येथील राणी दुर्गावती विश्वविद्यालयाचे प्राध्यापक आणि शिमला विश्वविद्यालयाचे माजी कुलपती आचार्य डॉ. अरुण दिवाकरनाथ वाजपेयी यांनी काढले.
सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी डॉ. वाजपेयी यांची नुकतीच सदिच्छा भेट घेतली. या वेळी सद्गुरु (डॉ.) पिंगळे यांनी त्यांना हिंदु जनजागृती समितीच्या कार्याविषयी विस्तृत माहिती दिली. या वेळी समितीचे मध्यप्रदेश राज्य समन्वयक श्री. योगेश व्हनमारे आणि समितीचे कार्यकर्ते श्री. अनिल गणोरकर उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात