छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात अन्य धर्मीयही सुखासमाधानाने रहात होते, तसेच हिंदु राष्ट्रातही राहू शकतात. याच्यात ब्राह्मणांचा प्रश्न कुठे येतो ? ब्राह्मणद्वेषाची कावीळ झालेल्यांना हे काय समजणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
नवी मुंबई : या देशात सर्वात अल्पसंख्य ब्राह्मण असून ते हिंदु राष्ट्राची निर्मिती करण्याची भाषा करत आहेत; परंतु प्रत्यक्षात त्यांना ब्राह्मणी राष्ट्र हवे आहे, असे तारे स्वतःला म्हणवणारे अब्दुल कादर मुकादम यांनी तोडले आहेत. ‘भारतीय संविधानासमोरील आव्हाने’ या विषयावरील परिसंवादाचे अध्यक्ष अब्दुल कादर मुकादम यांनी परळ येथे केले. अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे ३९ वे अधिवेशनाच्या परिसंवादात ते बोलत होते.
या वेळी म्हणाले,
१. सावरकरांनी १९२३ मध्ये लिहिलेल्या हिंदुत्व ग्रंथात स्पष्ट म्हटले आहे की, सिंधु नदीपासून सिंधु सागरापर्यंत ज्याची पुण्यभु आणि पितृभु आहे तोच या राष्ट्राचा नागरिक होऊ शकतो. सावरकर धूर्त होते. या दोन्ही अटी पूर्ण करणार्याला या देशाचे नागरिकत्व मिळू शकते, असा याचा अर्थ आहे. आता ही पुण्यभु आमची नाही, कारण आमचा (मुसलमान) आणि ख्रिस्त्यांचा धर्म अरबस्थानात आहे. या हिंदु राष्ट्राला तोंड देण्याची आणि सरळसरळ त्यांच्याशी सामना करण्याची जे स्वत:ला ‘सेक्युलर’ म्हणवतात त्यांची इच्छा आहे का ?
२. घटनेनुसार या देशातील पारंपरिक मंदिरे हिंदु समाजातील सर्व जातीच्या लोकांना मुक्त करता येतील, जातीच्या नावावर त्याला प्रतिबंध करता येणार नाही; परंतु प्रत्यक्षात अजूनही तसे होत नाही. (असे सध्या कुठेही नाही. हिंदु ऐक्याची आवश्यकता असतांना हिंदूंच्या मंदिरांविषयी अशा प्रकारे बोलून जातीयता निर्माण करणारे खरे धूर्त मुकादमच आहेत, असे हिंदूंना वाटले, तर ते चूक नव्हे ! त्यांनी स्वतःच्या मशिदींविषयी काय ते पहावे. अन्य धर्मियांच्या मंदिरांविषयी बोलण्याचा अधिकार त्यांना कुणी दिला ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
३. धर्मस्वातंत्र्याची बाधा होणार नाही, असे आहे, तर मग इतके वर्षे समान नागरी कायदा का झाला नाही ? खरे म्हणजे समान नागरी कायदा घटनेत नसून, तो समन्याय कायदा झाला पाहिजे होता, तो का केला नाही ? त्यामुळे मुसलमानांचा अनुनय होत आहे, असे समजून हिंदुत्वनिष्ठांचे आणि मुसलमानांचे ध्रुवीकरण होत आहे. म्हणजेच धर्म आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनातून बाहेर गेलेला नाही. हे आव्हान पेलायचे असेल, तर हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधात प्रचंड आघाडी निर्माण करावी लागणार आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात