Menu Close

हरिनाम सप्ताहासाठी आलेल्या ३५ वारकर्‍यांना १२ घंटे उपाशीपोटी ताटकळत ठेवले

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याचा हिंदुद्वेष !

कोपरखैरणे (नवी मुंबई) : येथे अखंड हरिनाम सप्ताहासाठी आळंदी येथून बोलावलेल्या ३५ वारकर्‍यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते विजय पाटील यांनी ठरल्याप्रमाणे पैसे न देता १२ घंटे उपाशीपोटी ताटकळत ठेवले. (अन्य धर्मियांच्या लोकांना असा त्रास देण्याचे धाडस राष्ट्रवादी काँग्रेसकडून झाले नसते, हे जाणून वारकर्‍यांनीही संघटित होण्याविना पर्याय नाही ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वारकर्‍यांमध्ये १२ ते १५ वर्षे वयोगटातील वारकरी विद्यार्थ्यांचाही समावेश होता.

१. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते वारकरी संस्थेला सप्ताहानिमित्त ८० सहस्र रुपये देेणार होते. २८ फेब्रुवारीला सप्ताहाचा समारोप झाल्यावर विजय पाटील यांनी वारकर्‍यांना पैसे देण्याचे आश्‍वासन देत १० मिनिटांत येतो, असे सांगून ते मंडपातून निघून गेले.

२. रात्र होऊनही ते न परतल्याने पैसे आणि जेवण यांविना वारकर्‍यांना थांबावे लागले. हे समजताच स्थानिक रहिवाशांनी वारकर्‍यांच्या जेवणाची सोय केली. (वारकर्‍यांचा विचार करणार्‍या स्थानिकांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

३. विजय पाटील यांनी ८० सहस्र रुपयांपैकी केवळ २२ सहस्र रुपयेच वारकरी मंडळाला दिले. पोलिसांनी खडसवल्यावर पाटील यांनी १३ सहस्र रुपये आणि २० सहस्र रुपयांचे दोन धनादेश दिले आहेत. (वारकर्‍यांनो, उर्वरित ५ सहस्र रुपयेही कार्यकर्त्याकडून वसूल करून घ्या ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *