मुलांना शाळेत योगाचे धडे देणार्या सातासमुद्रापलीकडील शाळेकडून भारतीय काही बोध घेतील का ?
- हिंदु धर्माची देणगी असलेल्या योगाविषयी भारतात एवढी उदासीनता का ?
- हिंदूंनो, भविष्यात हिंदु धर्मातील विविध शास्त्रांचा अभ्यास आपल्याला पाश्चात्त्यांकडून शिकावा लागेल, अशी नामुष्की ओढवून घ्यायची आहे का ? अर्थात् हिंदूंना असे सांगावे लागते, हे लज्जास्पद होय !
टोरांटो (कॅनडा) : येथील ब्रिटीश कोलंबिया राज्यातील सेन्ट्रल ओकानागन शाळेत १२ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना योग शिकवण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. या वर्गाला योग आणि चांगले आरोग्य १२ असे नाव देण्यात आले असून या विषयाचे शिक्षण एकूण १२० घंटे देण्यात येईल. यामध्ये योगाची तत्त्वे आणि अभ्यास, प्राणायाम, ध्यानधारणा, योगसूत्र, संस्कृत परिभाषा, ध्यानधारणेचे आध्यात्मिक लाभ, मंत्र पठण, योग सूत्रांचे पठण, आयुर्वेद इत्यादी विषय शिकवले जाणार आहेत.
या अभ्यासक्रमात स्वयं-शोध आणि स्वत:ला प्रतिबिंबीत करण्याचे मार्ग यांचाही समावेश आहे. (विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासासह योगाची जोड दिली जाण्याचा हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. यासाठी सेन्ट्रल ओकानागन शाळेचे अभिनंदन ! या उदाहरणातून तरी केंद्रशासनाने तथाकथित धर्मनिरपेक्षतावादी आणि हिंदुद्वेषी विरोधकांच्या विरोधाला तुडवून मुलांना सर्वतोपरी साहाय्य करणार्या आणि त्यांच्या जीवनात अमुलाग्र पालट घडवून आणण्यास सक्षम असणार्या योगाचे शिक्षण भारतभरातील शाळा-महाविद्यालयांत अनिवार्य करावे, ही अपेक्षा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात