पालिकेने कारवाईची अशी तत्परता अनधिकृत मशिदी आणि त्यांवरील भोंगे यांसंदर्भातही दाखवावी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
संभाजीनगर : शहागंज भागातील हिंदी विद्यालयासमोर बसस्थानक परिसरात असलेले तेलगू समाजातील कोच्चम्मा देवीचे (लक्ष्मीदेवी) लहान पुरातन मंदिर पालिकेने पाडले. पालिकेने मंदिराची जागा यापूर्वीच भूसंपादित केली होती. आयुक्तांनी मंदिर पाडण्याचा निर्णय दिल्याने अतिक्रमण निर्मूलन पथकाने मंदिर संपूर्णपणे भुईसपाट केले. ही कारवाई अतिक्रमण निर्मूलन पथकाचे प्रमुख एम्.बी. काजी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. भूसंपादनानंतर पालिका मंदिर सोडून इतर जागा घेईल, असे भाविकांना वाटले होते; परंतु काही दिवसांपूर्वी हे मंदिर पाडण्यासाठी पथक त्या ठिकाणी गेल्यावर भाविकांनी विरोध केला. त्यानंतर भाविक आणि प्रशासन यांची भूमिका मांडण्यासाठी पालिका आयुक्तांकडे सुनावणी घेण्यात आली. त्या वेळी आयुक्तांनी मंदिर पाडण्याचे आदेश दिले आणि भाविकांना नोटीस बजावण्यात आली. शहरातील कचरा प्रश्न अद्याप ऐरणीवर असतांना पालिकेने या विषयावरून लोकांचे लक्ष वळवण्यासाठी ही कारवाई केल्याचे बोलले जात आहे. (स्वतःच्या चुका झाकण्यासाठी पालिकेचे कुचकामी धोरण ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात )
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात