सतर्कतेने गोरक्षण करणार्या गोप्रेमींकडून इतरांनी आदर्श घ्यावा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
कराड (जिल्हा सातारा) : टेम्पोमधून कत्तलीसाठी घेऊन चाललेली ५५ वासरे आणि रेडके यांची करवडी येथे गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे सुटका करण्यात आली.
८ मार्चला झालेल्या जनावरांच्या बाजारातील अनेक वासरे आणि रेडके काही जण कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची असल्याची माहिती गोरक्षकांना मिळाली होती. त्याप्रमाणे गोरक्षकांनी लक्ष ठेवून ‘दोघे जण वाहनातून अनेक जनावरे फलटणच्या दिशेने नेत आहेत’, अशी माहिती पोलिसांना दिली आणि पोलिसांच्या साहाय्याने करवडी येथे टेम्पो अडवला; मात्र या वेळी टेम्पोचालक आणि त्याचा सहकारी पळून गेले. (अशा घटनांमध्ये अनेकदा वाहनचालक पळून जाण्यात यशस्वी का होतात, याचा विचार पोलिसांनी करणे आवश्यक आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात) चालकाचे नाव कुरेशी असल्याचे समजते.
गोरक्षक सर्वश्री प्रतीक ननावरे, गोरख ननावरे, संदीप शर्मा, ज्ञानेश्वर बघाणे, संग्राम पवार, वैभव जाधव आणि अधिवक्ता राजू गुप्ता यांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई करणे शक्य झाले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
0 Comments