Menu Close

जर्मनीत नागरिकांकडून विस्थापितांच्या निवासी छावणीला आग !

मानवता म्हणून आसरा देणार्‍या युरोपीय देशांविषयी कृतज्ञ न रहाता उलट त्यांनाच त्रास देणारे मुसलमान विस्थापितच यासाठी उत्तरदायी आहेत !

बर्लिन : जर्मनीत आश्रय घेणार्‍या मुसलमान विस्थापितांच्या विरोधात जनमत प्रक्षुब्ध झाले आहे. सॅक्सोनी प्रांतात एका विस्थापितांच्या छावणीत रूपांतर केलेल्या हॉटेलला आग लागल्यावर तेथे उपस्थित नागरिकांनी जल्लोष व्यक्त केला. ही आग स्थानिक नागरिकांनी लावल्याचा संशय पोलिसांना आहे.

जर्मनीत ११ लक्ष विस्थापित आले आहेत. मानवतेच्या दृष्टीकोनातून आलेले विस्थापित जर्मनीच्या मुख्य प्रवाहात समरस होण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्यांच्या मूळ मुसलमान देशांच्या संस्कृतीलाच प्राधान्य देतात, तसेच या विस्थापितांनी चोर्‍या, मारामार्‍या, बलात्कार असे गुन्हे करून विस्थापितांविषयी सहानुभूती असणार्‍या जर्मन नागरिकांच्याही सदिच्छा गमावल्या आहेत. जर्मनीत प्रवेश करणार्‍या विस्थापितांना घेऊन येणार्‍या बससमोर जर्मन नागरिक निषेध निदर्शने करत आहेत. काही ठिकाणी विस्थापितांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या पोलिसांवरही नागरिकांनी आक्रमणे केली. विस्थापितांच्या प्रश्‍नावरून शासनातही मतभेद आहेत. जर्मनीच्या चान्सलर अ‍ॅन्जेला मर्केल यांनी त्या मुसलमान देशांमधील परिस्थिती पूर्ववत झाल्यावर विस्थापितांना परत पाठवले जाईल, असे आश्‍वासन दिले असले, तरी जनतेचा त्यावर विश्‍वास बसत नाही. एकूणच विस्थापितांच्या वाढत्या संख्येमुळे केवळ जर्मनीतच नव्हे, तर संपूर्ण युरोप खंडात परिस्थिती बिकट झाली आहे. काही देशांनी विस्थापितांना शरण देण्यास नकार दिला आहे, तर तुर्की, ग्रीस या देशांत विस्थापितांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात 

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *