नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करणे, हाच सर्व समस्यांवरील एकमेव उपाय आहे, हे थापा आणि त्यांच्या मंत्र्यांना ज्या दिवशी लक्षात येईल, तो सुदिन !
हिंदूंच्या धर्मांतराविषयीही चिंता व्यक्त !
काठमांडू (नेपाळ) : घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करूनच हिंदुत्वाला नेपाळमध्ये पुनरुज्जीवित करण्यात येईल, असे निवेदन नेपाळचे उपपंतप्रधान कमल थापा यांनी धनागधी येथील एका कार्यक्रमात बोलतांना केले. नेपाळमध्ये सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यांना आलेली मरगळ खेदजनक असून त्यावर उपाययोजना करण्यात येईल, असेही थापा म्हणाले.
श्री. थापा यांच्या भाषणातील निवडक सूत्रे –
१. नेपाळमधील ९० टक्क्यांहून अधिक जनता हिंदु असली तरी तिचा आवाज योग्य रितीने ऐकला जात नाही. (उपपंतप्रधानांना उशिरा आलेली उपरती ! गेल्या वर्षी संविधान सभेने घेतलेल्या जनमतामध्ये ९५ टक्के जनतेने नेपाळला हिंदु राष्ट्र घोषित करण्याचा कौल दिला होता. त्यामुळे थापा आतातरी यावर विचार करतील, अशी आशा आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात ) इतर धर्मियांनी एकमेकांच्या धर्मांचा आदर करून आयुष्यातील प्रत्येक मार्गावर सहजीवनाचा आदर्श निर्माण करावा.
२. नेपाळमध्ये विदेशी संस्कृती आणि धर्म यांच्या वाढीविषयी चिंता व्यक्त करून श्री. थापा म्हणाले, गरीब नेपाळी जनतेच्या गरिबीचा अपलाभ घेऊन त्यांचे धर्मांतर करण्याचे प्रयत्न चालू आहेत. भोळ्या जनतेच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेणार्यांवर कारवाई केली जाईल. (भारतीय राज्यकर्ते यातून बोध घेतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात