Menu Close

प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांच्यावरील गोवा प्रवेशबंदी हटवा !

राज्यातील विविध संघटनांची उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

पणजी : श्रीराम सेनेचे प्रमुख श्री. प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांच्यावर घालण्यात आलेली गोवा प्रवेशबंदी त्वरित हटवावी, अशी मागणी राज्यातील विविध संघटनांनी १५ मार्च या दिवशी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनाची एक प्रत मुख्यमंत्री कार्यालय, शासनाची मंत्रीमंडळ सल्लागार समिती आणि दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी यांनाही देण्यात आली आहे. शिष्टमंडळामध्ये हिंदु एकता संघाचे श्री. हरिचंद्र शर्मा, म्हापसा येथील गणेश मंडळाचे श्री. एकनाथ म्हापसेकर, शिवसेनेचे माजी गोवा राज्यप्रमुख श्री. रमेश नाईक, गोमंतक मंदिर आणि धार्मिक संस्था महासंघाचे श्री. सुरेश वेर्लेकर, चिंबल येथील शिवप्रेमी श्री. त्रिवेंद्र नाईक, सनातन संस्थेचे श्री. गोपाल बंदीवाड आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयेश थळी यांचा समावेश होता.

जिल्हाधिकार्‍यांच्या अनुपस्थितीत अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री. विकास गावणेकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले.

श्री. प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांच्यावरील बंदी प्रत्येक ६ मासांनी वाढवली जात आहे. या बंदीमध्ये आणखी वाढ करण्यात येणार आहे का ? राज्यात आतंकवाद्यांशी संबंध असलेल्या रोहिंग्याच्या समर्थनार्थ फेरी काढण्यास अनुमती दिली जाते, वादग्रस्त पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला परिषद भरवण्यास अनुमती दिली जाते; मात्र संस्कृतीरक्षक, समाजाच्या उत्कर्षासाठी कार्य करणारे आणि समाज व्यसनमुक्त व्हावा, यासाठी कार्य करणार्‍या जेष्ठ व्यक्तीला गोवा प्रवेशबंदी का ? श्री. प्रमोद मुतालिक यांना गोव्यात देवदर्शनासाठी अनुमती का नाकारली जाते ? असे विविध प्रश्‍न शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे विचारले.

शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, श्री. प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांच्यावर वर्ष २०१४ पासून गोव्यात प्रवेशबंदी घालण्यात आली आहे. प्रारंभी ६ मासांसाठी असलेला हा बंदीकाळ आता प्रत्येक ६ मासांनी अमर्यादपणे वाढवला जात आहे. वास्तविक गोव्यात श्री. प्रमोद मुतालिक किंवा श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांनी राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवल्याची किंवा कायदा-सुव्यवस्था बिघडवल्याची एकही घटना घडलेली नाही. मंगळुरू येथे पबमध्ये झालेल्या आक्रमणाच्या प्रकरणी न्यायालयाने श्री. प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांची निर्दोष सुटका केली आहे. न्यायालयाच्या निवाड्यावरून स्पष्ट होत आहे की, श्री. प्रमोद मुतालिक यांना या प्रकरणात कोणतेही कारण नसतांना गोवण्यात आले होते आणि राजकीय सुडापोटी त्यांचा छळ करण्यात आला. गोवा शासनाने न्यायालयाच्या निर्णयाची दखल घेऊन श्री. प्रमोद मुतालिक आणि श्रीराम सेनेचे कार्यकर्ते यांच्यावर घातलेली अन्यायकारक गोवा प्रवेशबंदी तत्परतेने हटवून त्यांना देशात कुठेही फिरण्याचा संविधानिक अधिकार मिळवून द्यावा.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *