डॉ. श्रीपाल सबनीस यांची वैचारिक दिवाळखोरी
पुणे : दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशावर लादलेली आणीबाणी ही सहिष्णुता म्हणता येणार नाही. त्याचसमवेत गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा स्वातंत्र्यानंतरचा पहिला आतंकवादी आहे, हेही नाकारता येत नाही. (आतंकवादी कोणाला म्हणावे, हेसुद्धा न समजणारे साहित्यिक (?) डॉ. सबनीस यांच्या बुद्धीची कीव करावी तेवढी अल्पच आहे. – संपादक, दैनिक सनातन प्रभात ) त्याच नथुरामाचे उदात्तीकरण करण्याचे काम चालू असून ते दुर्दैवी आहे, असे विखारी प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्र विद्या विभागाच्या वतीने नुकत्याच आयोजित अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सद्यस्थिती या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. या प्रसंगी विभागप्रमुख डॉ. माधवी रेड्डी उपस्थित होत्या. जेएन्यूमधील घटनेविषयी सबनीस म्हणाले की, जेएनयूमधील घटना ही सहजासहजी घडलेली नाही. देशद्रोह आणि देशभक्ती यांची व्याख्या करणार्यांनी आपली बुद्धी कोणत्याही विचारसरणीच्या दावणीला न बांधता ती व्याख्या करावी. राष्ट्राविरोधात घोषणा देणे आणि शत्रूराष्ट्राचा जयजयकार करणे, हे अभिव्यक्ती स्वातंत्र्यात बसते का, यावर विचार करणे आवश्यक आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात