मिरज : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आमदार सुरेशभाऊ खाडे इंग्लिश स्कूल येथे प्रथमोपचार प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी घरात होणारे सर्वसाधारण अपघात यात भाजणे, कापणे, गुदमरणे, विजेचा धक्का, तसेच आग लागल्यावर काय करावे, या संदर्भात श्री. कैलास पाटील यांनी मार्गदर्शन केले. या वेळी डॉ. श्रीमती मृणालिनी भोसले उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका सौ. जयश्री खाडे आणि साहाय्यक संयोजक तृप्ती जोशी यांचे सहकार्य लाभले. या प्रसंगी प्रथमोपचाराची प्रात्यक्षिके करून दाखवण्यात आली. याचा लाभ इयत्ता ८ ते १० वीतील ४०० विद्यार्थी, शाळेतील शिक्षक, तसेच कर्मचारी वर्ग यांनी घेतला !
धर्माचरण हेच अनेक समस्यांवर उत्तर ! – कु. प्रतिभा तावरे
मिरज : पूर्वीच्या काळात महिला धर्माचरण करत होत्या, तसेच साधना करत असल्याने अत्याचारांचे प्रमाण खूपच अल्प होते. आज समाज धर्माचरण करत नाही, तसेच महिलाही धर्माचरण करत नाहीत त्यामुळे महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. कठीण प्रसंगांना तोंड देण्यासाठी मानसिक सामर्थ्यासमवेत साधनाही करणे आवश्यक आहे. त्यामुळे धर्माचरण हेच सध्याच्या अनेक समस्यांवर उत्तर आहे, असे मार्गदर्शन हिंदु जनजागृती समितीच्या कु. प्रतिभा तावरे यांनी केले. येथील गर्डर विठ्ठल मंदिर येथे नामदेव शिंपी समाजाच्या वतीने जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. याचा लाभ ४० हून अधिक महिलांनी घेतला.
कार्यक्रमाची प्रस्तावना आणि आभार प्रदर्शन सौ. संगिता धोंगडे यांनी केली. या प्रसंगी श्रीमती सुरेखा पिसे, सौ. लक्ष्मीबाई रेळेकर, सौ. वैशाली माळवदे, गर्डर विठ्ठल मंदिर विश्वस्त श्री. ज्ञानेश्वर धोंगडे, अध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर रेळेकर, सर्वश्री बाबूराव माळवदे, श्री. पांडुरंग गानबोले, शिवतीर्थ उत्सव समितीचे अध्यक्ष सुधीर अवसरे उपस्थित होते. या प्रसंगी कार्यक्रमस्थळी सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांचे प्रदर्शन लावण्यात आले होते.
जयसिंगपूर : येथे युवकांचा नवा महाराष्ट्र या स्थानिक वृत्तपत्र-वृत्तवाहिनीने हिंदु जनजागृती समितीच्यरा सौ. सुप्रिया घाटगे यांची मुलाखत घेतली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात