पोलीस अधिकार्यांसह ६० जण घायाळ
बॉम्ब फेकल्यामुळे २ जण घायाळ
- असे व्हायला हा भारत आहे कि पाक ? एवढे होईपर्यंत सरकार आणि पोलीस झोपले होते का ?
- हिंदूंनो, तुमचे सण भयमुक्त वातावरणात साजरे करता येण्यासाठी आतातरी हिंदु राष्ट्राची अनिवार्यता जाणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
भागलपूर (बिहार) : नववर्षारंभानिमित्त काढलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांकडून दगडफेक आणि गोळीबार करण्यात आला. या घटनेत वरिष्ठ पोलीस अधिकार्यांसह ६० जण घायाळ झाल्याचे सांगण्यात आले.
भागलपूर येथील नाथनगर येथे नववर्षारंभाच्या पूर्वसंध्येला ‘नववर्ष आयोजन समिती’च्या वतीने एका मंदिरापासून मिरवणूक काढण्यात आली होती. ही मिरवणूक मेदीनगर चौकात पोहोचताच काही धर्मांधांनी या मिरवणुकीत लावण्यात आलेल्या एका गीतावर आक्षेप घेतला. यावरून दोन्ही गटांत शाब्दिक चकमक झाली. त्याचे पर्यावसान धुमश्चक्रीत होऊन धर्मांधांनी दगडफेक केली. या वेळी धर्मांधांनी अनेक दुकाने, तसेच वाहने पेटवून दिली. एका रिक्शाचीही तोडफोड करण्यात आली. एवढेच नव्हे, तर धर्मांधांनी गोळीबारही केला. त्यांनी बंदुकीतून १५ गोळ्या झाडल्याचे सांगण्यात आले, तसेच ४ बॉम्बही फोडले. अनुमाने ३ घंट्यांहून अधिक वेळ हा प्रकार चालू होता. दंगलखोरांना आटोक्यात आणण्यासाठी ४ जिल्ह्यांतील पोलिसांना पाचारण करण्यात आले. खबरदारीचा उपाय म्हणून भागलपूरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.
जीव वाचवण्यासाठी पोलिसाने घेतला मंदिराचा आधार !
वरील घटनेच्या वेळी धर्मांधांनी केलेल्या दगडफेकीत काही पोलीस अधिकारी घायाळ झाले. नाथनगर येथील एका पोलीस अधिकार्याने मंदिरात लपून बसून स्वतःचा जीव वाचवला.
मोठा पोलीस बंदोबस्त
या घटनेनंतर ४ जिल्ह्यांचे पोलीस, ‘क्विक रिस्पॉन्स टीम’, सी.टी.एस्.चे प्रशिक्षिक सैनिक, तसेच इतर पोलीस यांच्या साहाय्याने जमावावर नियंत्रण आणले गेले. तथापि परिसरात तणाव कायम आहे. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी चालू केली आहे.
…अन् २ घटनांत पोलीसच पळून गेले !
असे पळपुटे पोलीस जनतेचे रक्षण काय करणार ? अशा पोलिसांना सरकारने आता घरीच बसवले पाहिजे ! यावरून पोलिसांना कशा प्रकारचे प्रशिक्षण दिले जाते, हे लक्षात येते !
१. या वेळी धर्मांधांनी केलेल्या गोळीबारात एक पोलीस आणि एक हवालदार यांना गोळी लागून ते घायाळ झाले. याच गोळीबारात एक नागरिकही घायाळ झाला. याशिवाय धर्मांधांनी ४ बॉम्ब फेकले. यात दोन जण घायाळ झाले. धर्मांधांची आक्रमकता पाहून पोलीस पळून गेले. अनेक पोलीस अधिकार्यांनाही मागे हटावे लागले.
२. सर्व शांत झाल्यानंतर युवकांच्या एका गटाने पोलीस ठाण्याच्या बाजूच्याच वस्तीत रहाणार्या दुसर्या एका गटावर दगडफेक केली, तसेच भ्रमणभाषचे दुकान पेटवून दिले. २० मिनिटांनंतर पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी युवकांना हुसकावून लावले. यानंतर या युवकांनी पोलिसांवरच दगडफेक केली. तेव्हा तेथूनही पोलिसांनी पळ काढला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात