श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासातील भ्रष्टाचाराचे प्रकरण
तळोजा (नवी मुंबई) : ११ मार्च या दिवशी सायंकाळी ५ वाजता येथे श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासातील झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात स्वाक्षरी अभियान घेण्यात आले. या अभियानात तळोजातील स्वराज्य मावळा प्रतिष्ठानचे २५ युवक सहभागी झाले होते. या युवकांनी अनेक लोकांना स्वत:हून विषयाचे गांभीर्य सांगून सही करण्यास प्रवृत्त केले.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम या वेळी म्हणाले की, आमच्या मंदिरात लोक श्रद्धेने अर्पण करतात. त्याचा अशाप्रकारे अपवापर होणे आम्ही कदापी सहन करणार नाही. यांना कठोरात कठोर शासन होईपर्यंत समिती गप्प बसणार नाही. देवधनाचा असा अपहार करणे महापाप आहे. आज आपण पहातो की, सरकारच्या सर्व क्षेत्रांत भ्रष्टाचार आहे. आता देवाच्या दरबारातसुद्धा भ्रष्टाचार व्हायला लागला आहे. आता आम्ही श्रद्धाळू हिंदु हे संघंटितपणे संविधानिक मार्गाने याला सातत्याने विरोध करून असे प्रकार बंद करणार. हिंदूंचीच मंदिरे सरकारच्या कह्यात का ? ही मंदिरे भाविकांच्या कह्यात द्यावीत, म्हणजे असे प्रकार बंद होतील. यासाठी समिती सतत योग्य मार्गाने याचा पाठपुरावा करेल.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात