Menu Close

एल्गार परिषदेत प्रक्षोभक विधाने करून महाराष्ट्र बंद पुकारणार्‍यांना अटक करा !

समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे निवेदन

एल्गार परिषद, पुणे

कोल्हापूर : कोरेगाव भीमा प्रकरणात ३ जानेवारी २०१८ या दिवशी महाराष्ट्र बंद पुकारून सार्वजनिक, तसेच खासगी मालमत्तेची हानी करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात मागासवर्गीय विरुद्ध हिंदू असे चित्र निर्माण करून वैयक्तिक राजकीय स्वार्थ साधण्यासाठी याचा वापर करण्यात आला. सदरचे कृत्य करण्यासाठी पुण्यात एल्गार परिषदेचे आयोजन करून व्यासपिठावरून प्रक्षोभक विधाने करण्यात आली. तरी डॉ. प्रकाश आंबेडकर, जिग्नेश मेवाणी, उमर खालीद, जोगेंद्र कवाडे आणि प्रमुख पदाधिकारी यांना दंगल घडवल्याच्या प्रकरणी तत्काळ अटक करून महाराष्ट्र बंद करून सार्वजनिक, तसेच खासगी मालमत्तेची हानी वसूल करून संबंधितांना मिळावी, अशा मागणीचे निवेदन समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने तहसीलदार गुरु बिराजदार यांना देण्यात आले.

कोल्हापूर येथे गृह विभागाचे तहसीलदार श्री. गुरु बिराजदार (डावीकडून पाचवे ) यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ

मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेल्या निवेदनात म्हटले आहे की….

१. तीन वर्षांपूर्वी सामाजिक संकेतस्थळावरील मजकुरामुळे दंगल घडल्यावर हिंदुराष्ट्र सेनेचे श्री. धनंजय देसाई यांना मोहसीन शेख या युवकाच्या हत्येच्या प्रकरणात अटक झाली होती. त्या वेळी श्री. देसाई घटनास्थळी नसतांनाही त्यांच्यावर दंगलीचा आरोप ठेवून गुन्हा प्रविष्ट झाला आहे. त्याचप्रकारे ३ जानेवारी २०१८ मध्ये दंगलीच्या वेळी राहुल फटांगडे या युवकाने छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा असलेला सदरा परिधान केल्याने त्याची हत्या करण्यात आली. डॉ. प्रकाश आंबेडकर आणि त्यांचे सहकारी यांना या हत्येसाठी उत्तरदायी ठरवून त्यांना तत्काळ अटक करावी.

२. मृत राहुल फटांगडे याच्या परिवारास तत्काळ २५ लक्ष रुपयांचे शासकीय साहाय्य देण्यात यावे.

३. कोल्हापूर आणि इतरत्र ठिकाणी पोलीस, पत्रकार यांच्यावर आक्रमण करणारे अद्यापही मोकाट फिरत आहेत. त्यांना तत्काळ अटक करावी.

या वेळी बजरंग दलाचे जिल्हाप्रमुख श्री. संभाजी (बंडा) साळुंखे, शहरप्रमुख श्री. महेश उरसाल, शिवसेनेचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, वंदे मातरम युथ ऑर्गनायझेशनचे श्री. अवधूत भाट्ये, अधिवक्ता केदार मुनीश्‍वर, हिंदु एकताचे श्री. अण्णा पोतदार, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. शरद माळी, सर्वश्री सुनील पाटील, जयदीप शेळके, गणेश लाड, नंदकिशोर अहिर, गोविंदराव देशपांडे, हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री सुधाकर सुतार, मधुकर नाझरे, शिवानंद स्वामी यांसह अन्य उपस्थित होते.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *