Menu Close

हिंदु नववर्षाचे महाराष्ट्र आणि गोवा राज्यांत उत्साहात स्वागत !

भगवे ध्वज आणि ढोल-ताशांसह पारंपरिक पोषाखात मिरवणुका

हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचाही सहभाग

ठाण्याची शोभायात्रा

मुंबई : चैत्र शुद्ध प्रतिपदा ! हिंदूंचे या कलियुगातील ५१२० वे नूतन वर्ष आज आरंभ झाले. या निमित्ताने महाराष्ट्रातील बहुतांश सर्व प्रमुख शहरांत हिंदूंनी भगवे ध्वज घेऊन ढोल-ताशांसह पारंपरिक वेषात फेर्‍या काढून नवीन वर्षाचे स्वागत करून एकमेकांना शुभेच्छा दिल्या. काही ठिकाणी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांनीही या फेरीत सहभागी होऊन स्वसंरक्षण प्रात्यक्षिके सादर केली.

मुंबईत गिरगाव, दहिसर, डोंबिवली, ठाणे येथे सकाळपासूनच शोभायात्रा काढण्यात आल्या. सर्वत्र भव्य आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. गोवा राज्यातही नूतन वर्षाचे भव्य स्वागत करण्यात आले.

ठाण्याच्या शोभायात्रेतील प्रात्यक्षिके

चित्ररथ, प्रतिकृती, देखावे यांच्या सोबतीला ढोल-ताशांचा गजर आणि लेझीमचा ताल यामध्ये भगवे ध्वज उंचावून मिरवणुका जात होत्या. काही ठिकाणी बालकांनी महापुरुषांचे वेश परिधान केले होते. मुंबईतील मिरवणुकीत परदेशी पाहुणेही सहभागी झाले होते. गिरगावमध्ये महिला बाईकवरून फेरीत सहभागी झाल्या होत्या. रत्नागिरीत पाणी वाचवण्याचा संदेश मिरवणुकीतून देण्यात आला, तर पंढरपुरात परंपरेप्रमाणे ब्रह्मध्वज पालटण्यात आला. नाशिक आणि सांगली येथेही मोठ्या प्रमाणात ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुका निघाल्या.

अंबरनाथ येथील शोभायात्रा

कोल्हापूर येथे मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणारी शोभायात्रा निघाली, तर इचलकरंजी येथे पहाटे गायनाच्या कार्यक्रमाने नववर्षाचे स्वागत करण्यात आले.

 

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *