गोवंश हत्या बंदीचा कायदा असूनही नसल्यासारखा वाटणारे महाराष्ट्र राज्य ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
ठाणे : वागळे इस्टेट येथील रहिवासी सुनील यादव यांच्या भागातील बॉम्बे बीअर कंपनीनजीक असलेल्या तबेल्यातून दोन गायी चोरीस गेल्या होत्या. या गुन्ह्यातील आरोपी मुंब्रा येथील ग्रीन लॉन धाब्याजवळ येणार असल्याची माहिती मिळाल्याने पोलिसांनी सापळा रचून मुंब्रा-कौसा येथील धर्मांध असीफ यासीन कुरेशी (२४), मोनिस फिदाहुसेन कुरेशी (२०), कल्याण येथील इरफान गुलाम मोहम्मद मुल्ला (३५) आणि फजल अयुब कुरेशी (२२) यांना कह्यात घेतले. त्यांच्याजवळून जनावरांना मारण्याचे इंजेक्शन आणि पीकअप जीप हस्तगत केली. वागळे इस्टेट येथून दोन जर्सी गायी चोरल्याची कबुली त्यांनी दिली. चोरीच्या गायी कल्याणच्या दोन आरोपींना विकल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी कल्याण येथील लाईक यासीन कुरेशी (३२) आणि शफिक हनीफ कुरेशी (३२) यांना कटक कली. चोरीच्या गायींची बदलापूर येथे निर्जनस्थळी कत्तल केल्याची कबुली या आरोपींना दिली.
२५ गायी चोरल्याचा संशय !
आरोपींमध्ये काही कसायांचाही समावेश आहे. त्यांनी ठाणेव्यतिरिक्त रोहा, चिपळूण आणि महाड येथेही गायींची चोरी केल्याची शक्यता आहे. आतापर्यंत त्यांनी अनुमाने २५ गायी चोरल्याचा संशय असून त्याअनुषंगाने तपास चालू असल्याची माहिती तपास अधिकारी दत्त सरक यांनी दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात