Menu Close

दिघी येथे धर्मांधाने विवाहित हिंदु महिला आणि मुले यांना पळवले

हिंदुत्वनिष्ठांनी विचारणा केल्यावर अपहरणाची तक्रार पोलिसांनी प्रविष्ट केली

हिंदूंनो, आपल्या लेकी-सुनांना धर्मशिक्षण द्या आणि धर्मांधांपासून वाचवा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

दिघी (जिल्हा पुणे) : २५ वर्षीय विवाहित हिंदु महिला आणि तिच्या २ मुलांना एका धर्मांधाने दिशाभूल करून पळवून नेल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात प्रथम माहिती अहवाल प्रविष्ट करण्यात आला आहे. तक्रारदार शशांक शिंगाडे यांनी लव्ह जिहादच्या माध्यमातून हे प्रकरण घडले असून धर्मांधाने पत्नीची दिशाभूल करून पळवून नेल्याचे म्हटले आहे. (‘लव्ह जिहाद’असे काही नसते, असे म्हणणारे लोकप्रतिनिधी आणि विचारवंत (?) याविषयी अवाक्षरही काढणार नाहीत ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या प्रकरणी धर्मांध आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध भा.दं.वि. कलम ३६४ (अपहरण) आणि कलम ३४ (सामूहिक गुन्हा) अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.

शशांक शिंगाडे घरी नसल्यावर धर्मांध त्यांच्या पत्नीला गाडीवरून फिरायला घेऊन जायचा. ही गोष्ट कळल्यावर शशांक शिंगाडे यांचा आणि धर्मांधाचा काही मासांपूर्वी वाद झाला होता. तेव्हा ‘तुझ्या बायको-मुलांना पळवूनच नेतो’ अशी धमकी धर्मांधाने दिली होती. त्यानंतर शशांक शिंगाडे यांना २६ फेब्रुवारी या दिवशी महिला आणि मुले घरात नसल्याचे लक्षात आले. त्यावर शिंगाडे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी गेल्यावर पोलिसांनी हरवल्याची तक्रार नोंदवून घेतली. शिंगाडे यांनी परिसरात चौकशी केल्यावर धर्मांधही बेपत्ता असल्याचे लक्षात आले. त्यांनी धर्मांधाच्या विरोधात अपहरणाची तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाणे गाठले. त्या वेळी पोलिसांनी अपहरणाची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली. हे प्रकरण हिंदुत्वनिष्ठांना समजल्यानंतर बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान, हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना तक्रार नोंदवण्यासाठी टाळाटाळ करत असल्याविषयी विचारणा केली. त्यानंतर पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली. याविषयी पुढील तपास चालू असल्याचे पोलीस निरीक्षक खंडेराव खैरे यांनी सांगितले आहे. (तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ करणारे पोलीस गुन्ह्याचा तपास तत्परतेने करतील, याची शाश्‍वती आहे का ? हिंदूंच्या समस्यांना नेहमीच दुय्यम महत्त्व दिले जाते, हे ओळखून हिंदूंचा दबावगट निर्माण होण्यासाठी व्यापक हिंदु संघटन करणे आवश्यक आहे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *