तिरुनेल्वेली येथे कलम १४४ लागू
- ‘रामराज्य रथयात्रे’ला विरोध करायला हा भारत आहे कि पाकिस्तान ?
- ज्यांना अयोध्येत राममंदिर नको आहे, त्यांनी पाकमध्ये चालते व्हावे !
- द्रमुक पक्षाचा हिंदुद्वेष जाणा ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
चेन्नई : विश्व हिंदु परिषदेच्या देशव्यापी ‘रामराज्य रथयात्रे’ने २० मार्चला राज्यात प्रवेश केला. ‘या यात्रेमुळे राज्यातील धार्मिक वातावरण बिघडेल आणि शांततेला धोका निर्माण होईल’, असे सांगत तमिळनाडूमधील मुख्य विरोधी पक्ष द्रमुकने यात्रेला थांबवण्याची मागणी केली आहे. यात्रेच्या सूत्रावरून द्रमुकचे कार्यकारी अध्यक्ष एम्.के. स्टॅलिन यांनी विधानसभेत घोषणाबाजी करत सभात्याग केला आणि यात्रेला विरोध दर्शवला. याच कालावधीत स्थानिक विरोधी पक्ष आणि मुसलमान संघटना यांच्याकडून होत असलेल्या विरोधामुळे तिरुनेल्वेली येथे प्रशासनाकडून २३ मार्चपर्यंत कलम १४४ लागू करण्यात आले आहे.
१. विधानसभेत घोषणाबाजी केल्यानंतर रस्त्यावर ठिय्या आंदोलन करणारे स्टॅलिन आणि इतर आमदार अशा एकूण ४४ जणांना पोलिसांनी कह्यात घेतले आहे.
२. पोलीस अधीक्षक डॉ. अरुण शक्तीकुमार म्हणाले की, रथयात्रेला प्रशासनाची अनुमती मिळाली असल्याने यात्रेत अडथळा निर्माण करणार्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येईल.
३. १३ फेब्रुवारीपासून अयोध्येतून निघालेल्या रामराज्य रथयात्रेतील पहिला टप्पा २५ मार्चला रामेश्वरम् येथे संपणार आहे. त्यानंतर ही यात्रा कन्याकुमारीहून पुन्हा काश्मीरला रवाना होईल.
(म्हणे) त्यांना ‘रामराज्य’ स्थापन करायचे आहे, तर आम्हाला ‘इंडिया’ हवे आहे !’ – आमदार अबू बकर, द्रमुक
यात्रेचे आयोजन करणार्यांना देशामध्ये रामराज्य स्थापन करायचे आहे; पण आम्हांला या देशात ‘इंडिया’ या राज्याची आवश्यकता आहे. याच कारणामुळे आम्ही सरकारला नोटीस दिली; पण सरकार या सूत्रावर कोणतीही कारवाई करत नाही. त्यामुळे आम्ही सभात्याग केला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात