Menu Close

रायगड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीने नववर्ष शोभायात्रांत विविध ठिकाणी सहभाग घेऊन केला हिंदु संस्कृतीचा जागर !

रायगड : नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी शोभायात्रांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नववर्षाचे स्वागत करण्यात आले. या शोभायात्रांत समितीने सहभाग घेऊन हिंदु संस्कृतीची महानता समाजाला सांगितली.

वशेणी – या गावात नववर्ष स्वागतयात्रेत विविध संघटना सहभागी झाल्या होत्या. या वेळी सनातनचे श्री. राजेश पाटील यांनी ‘नववर्ष पाडव्याला का साजरे करायचे’ हे सांगून प्रबोधन केले. या वेळी १०० धर्मप्रेमी उपस्थित होते.

कोलाड आणि आणि पेण येथे नववर्ष स्वागतफेरीत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग होता.

कामोठे – हिंदु नववर्ष स्वागत समिती कामोठे यांनी आयोजित केलेल्या फेरीत सनातनच्या बालसंस्कारवर्गातील बालसाधकांनी ‘हिंदु संस्कृतीप्रमाणे आचरण करा’, या विषयावर प्रबोधन करून राष्ट्र आणि धर्म प्रेम जागृत केले. समितीच्या रणरागिणी शाखेने स्वसंरक्षण प्रशिक्षण प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून लोकांमधील क्षात्रवृत्ती जागृत केली. समितीचा प्रथमोपचार कक्षही या फेरीत होता.

कळंबोली (नवी मुंबई) – गुढीपाडव्याच्या निमित्ताने सांस्कृतिक आणि सामाजिक सेवा संस्थेच्या वतीने नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समितीप्रणीत रणरागिणी शाखेनेही या फेरीत सहभाग घेतला होता. येथे शोभायात्रेत सहभागी होऊन फलकांद्वारे नागरिकांचे प्रबोधन करण्यात आले. गुढीपूजनही सनातनचे साधक दांपत्य श्री. आणि सौ. जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी सनातन संस्थेच्या बालसाधकांनी संस्कृती संवर्धनासाठी प्रयत्न व्हावेत याविषयी माहिती देणारे फलक हातात धरून प्रबोधन केले. हिंदु जनजागृती समितीच्या रणरागिणी शाखेच्या माध्यमातून स्वसंरक्षण प्रशिक्षणाची लाठीकाठी, नानचाकू चालवणे आदी प्रात्याक्षिके करून दाखवण्यात आली. या प्रात्यक्षिकांचे सादरीकरण हे फेरीचे महत्त्वाचे आकर्षण ठरले. या फेरीत समितीचे प्रथमोपचार पथकही सहभागी झाले होते.

प्रतिसाद

१. स्वसंरक्षण प्रात्याक्षिके पाहून समाजातील २ युवकांनीही त्यात सहभाग घेतला.

२. अनेकांनी स्वसंरक्षण प्रात्यक्षिकांचे चित्रीकरण केले आणि ‘खरेच ही काळाची आवश्यकता आहे’ असे मत व्यक्त केले.

३. आयोजक म्हणाले ‘‘संस्कृती जपण्यात सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती पुष्कळ मोलाचे योगदान देत आहे.’’

मुंबई येथे ढोलताशे आणि शोभायात्रा काढून उत्साहात गुढीपाडवा सण साजरा !

मुंबई : गिरगाव आणि दहिसर येथे सकाळपासूनच शोभायात्रा काढण्यात आल्या. या शोभायात्रांमध्ये पारंपरिक पोषाखासह भगवे झेंडे, चित्ररथ, प्रतिकृती, देखावे, रांगोळ्या यांच्यासमवेत ढोल-ताशांचा गजर, लेझीमचा ताल, असे वातावरण सर्वत्र होते. परशुराम, समर्थ रामदासस्वामी यांची प्रतिकृती, खंडोबाराया आणि घारापुरीलेणीचा चित्ररथ हे या शोभायात्रेतील आकर्षण होते. प्रजासत्ताकदिनी देहलीच्या राजपथवर झालेल्या संचलनात महाराष्ट्राच्या ज्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पडकावला, तो चित्ररथ शोभायात्रेच्या पुढे होता.

धारावी : आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळख असलेल्या धारावीमध्ये यंदाही गुढीपाडव्याचा उत्साह पहायला मिळाला. धारावी येथील महाराष्ट्र सांस्कृतिक उत्सव मंडळाच्या वतीने मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी  पारंपरिक वाद्यांसह फेरी काढण्यात आली. या फेरीत छत्रपती शिवाजी महाराज, विठ्ठल-रुक्मिणी, झाशीची राणी, स्वामी विवेकानंद यांचा वेष परिधान करून लहान मुलांनी सामाजिक संदेश दिला.

आपल्या महान संस्कृतीचा प्रत्येक हिंदूने अभिमान बाळगला पाहिजे ! – लक्ष्मण जठार, हिंदु जनजागृती समिती

मुंबई : आदर्श जीवन पद्धतीसाठी हिंदु राष्ट्र ही काळाची आवश्यता असून त्यासाठी  हिंदु संस्कृतीचे पालन अर्थात धर्माचरण आणि संतांनी सांगितल्याप्रमाणे साधना केली पाहिजे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे श्री. लक्ष्मण जठार यांनी केले. भांडुप येथील सह्याद्री विद्या मंदिर येथे आयोजित केलेल्या प्रवचनात ते बोलत होते. या वेळी ५०० विद्यार्थी आणि २५ शिक्षक उपस्थित होते. ‘‘आम्हाला विषय पूर्णपणे आकलन झाला. यापुढे आम्ही शास्त्राप्रमाणे गुढीपाडवा साजरा करू’’, अशा प्रतिक्रिया शाळेतील शिक्षकांनी व्यक्त केल्या.

भांडुप येथे सामूहिक गुढीपूजन

भांडुपचे माजी मनसे उपविभाग प्रमुख श्री. अनिल राजभोज यांच्या कोकणनगर येथील कार्यालयात धर्मप्रेमी श्री. संतोष ब्रीद, श्री. संदेश घाडीगावकर, तसेच मनसैनिक यांनी सामूहिक गुढी उभारली. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे श्री. गणेश पाटील यांनी उपस्थितांना गुढीपाडव्याचे महत्त्व सांगितले. ते ऐकून सर्वांनी आभार व्यक्त केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *