- स्वातंत्र्यापासून आतापर्यंत ७० वर्षांत एकातरी शासनकर्त्याने शत्रूराष्ट्राला अशी चेतावणी देण्याचे धाडस दाखवले आहे का ?
- कुठे राष्ट्रहितासाठी रक्तरंजित संघर्ष करण्यासही मागे-पुढे न पहाणारा बाणेदार चीन, तर कुठे गेल्या ७० वर्षांपासून कपटी पाकशी चर्चेद्वारे प्रश्न सोडवण्याचा भोळसट आशावाद बाळगणारे आतापर्यंतचे कणाहीन भारतीय शासनकर्ते ! भारतीय शासनकर्ते चीनकडून बाणेदारपणा शिकतील का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
बीजिंग : आमची जनता साहसी असून आम्ही शत्रूच्या विरोधात रक्तरंजित संघर्षासाठी सिद्ध आहोत. आम्ही आमची १ इंचही भूमी शत्रूला देणार नाही, अशी दर्पोक्ती चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी केली. संसदेच्या अधिवेशनाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते. भारत आणि चीन यांच्यात सीमेवरून चालू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर जिनपिंग यांचे हे विधान गांभीर्याने घेण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले जात आहे. जिनपिंग पुढे म्हणाले, ‘‘चीनची जनता आणि चिनी सरकार संघटित असून कुणीही आमच्याकडून भूमी हिसकावून घेऊ शकत नाही. जगात अव्वल स्थान गाठण्याची क्षमता आमच्यात आहे. गेली १७० वर्षे याच स्वप्नासाठी आम्ही लढत आहोत. आज चीनची जनता त्या स्वप्नाच्या जवळ पोहोचली आहे.’’ चिनी संसदेने गेल्याच आठवड्यात कायद्यात पालट करून राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना राष्ट्रध्यक्षपदावर आजीवन रहाण्याचा मार्ग मोकळा केला. माओ यांच्यानंतर आजीवन अधिकारपदावर रहाणारे जिनपिंग हे पहिलेच नेते आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात