Menu Close

हिंगोली येथे धर्मांधांकडून साहाय्यक पोलीस निरीक्षकांवर तलवारीने आक्रमण

जिथे पोलीस अधिकारीच असुरक्षित आहेेत, तिथे धर्मांधांपासून जनतेचे रक्षण कोण करणार ? धर्मांधांकडून आतापर्यंत केरळ, त्रिपुरा, बंगाल, उत्तरप्रदेश आदी राज्यांमधील पोलीस आणि हिंदू यांच्यावर आक्रमणे होत होती. आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातही अशा आक्रमणांचे प्रमाण वाढत आहे, हे शासनकर्ते आणि पोलीस यांना लज्जास्पद ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

कळमनुरी (जिल्हा हिंगोली) : शहरातील नवीन बसस्थानकासमोरील रस्त्यावर ४ धर्मांधांनी २० मार्च या दिवशी साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांच्यावर तलवारीने आक्रमण करून त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. (धर्मांधांच्या आक्रमणाला प्रत्युत्तर देण्यासाठी पोलीस सिद्ध नसणे दुर्दैवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यांच्या हाताला दुखापत झाली आहे. याप्रकरणी अटक केलेले शेख जहीर शेख माझीद, मोहम्मद जहीर मोहम्मद तकीब, शेख जावेद शेख अब्दुल्ला आणि शेख आवेस शेख याहिया या चौघांना न्यायालयाने २३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणणे आणि जिवे मारण्याची धमकी देणे याप्रकरणी गुन्हा प्रविष्ट करण्यात आला आहे.

संबंधित परिसरात काही जण हाणामारी करत असल्याचे समजल्यावर साहाय्यक पोलीस निरीक्षक सुधाकर आडे हे पोलीस कर्मचार्‍यांसह तेथे गेले होते.  पोलिसांनी हाणामारी करणार्‍या तरुणांना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केली, तसेच जीपमधून तलवार आणून आडे यांच्यावर आक्रमण केले. (यावरूनच धर्मांधांच्या हिंसक मनोवृत्तीची कल्पना येते ! वाहनांमधून तलवारीसारखे घातक शस्त्र घेऊन फिरणार्‍या धर्मांधांवर कारवाई व्हायला हवी ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) पोलीस कर्मचारी सूर्यवंशी यांनी आक्रमण करणार्‍या तरुणाला रोखून त्याच्या हातातील तलवार हिसकावून घेतली. त्यामुळे अनर्थ टळला.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *