हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांचा नेपाळ दौरा
काठमांडू : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘मानव धर्म सेवा समिती नेपाळ’च्या प्रमुख चमेली बाईजी यांची १८ मार्च या दिवशी भेट घेतली. या वेळी चमेली बाईजी यांनी नेपाळमध्ये हिंदूंच्या धर्मांतराच्या विरोधात कार्य करतांना आलेले अनुभव कथन केले. त्यांनी सांगितले, ‘‘ख्रिस्ती मिशनरी दलित आणि आदिवासी रहात असलेल्या ठिकाणी जाऊन ‘गीता, रामायण, वेद इत्यादी ग्रंथ ब्राह्मणांचे आहेत’, असा अपप्रचार करतात आणि हिंदूंमधील उच्च वर्णीयांच्या विरोधात द्वेष पसरवतात. दुसरीकडे या धर्मांतराविषयी उच्च वर्णियांशी बोलल्यावर त्यांना दलितांच्या धर्मातराविषयी काहीही वाटत नाही.’’ याविषयी बोलतांना सद्गुरु (डॉ.) पिंगळे म्हणाले, ‘‘वैचारिक आणि बौद्धिक प्रतिकार करून ख्रिस्ती धर्माचा खरा इतिहास सांगणे हाच धर्मांतर थांबवण्याचा मूलभूत उपाय आहे. यासाठी कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे.’’ ही भेट ‘मानव धर्म सेवा सीमती नेपाळ’चे श्री. सागर कटवाल यांनी घडवून आणली.
क्षणचित्रे
१. श्री. कटवाल हे गोवा येथील सनातनच्या आश्रमात येऊन गेले आहेत. या वेळी त्यांनी चमेली बाईजी यांना गोवा येथील सनातनच्या आश्रमात चालणार्या राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्याविषयी माहिती दिली, तसेच त्यांना गोवा येथील सनातनच्या आश्रमात भेट दिल्यावर शिकायला मिळालेली सूत्रेही सांगितली.
२. ‘सदगुरु (डॉ.) पिंगळे यांच्या भेटीत पुष्कळ काही शिकायला मिळाले’, असे ‘मानव धर्म सेवा समिती नेपाळ’च्या प्रमुख चमेली बाईजी यांनी सांगितले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात