पू. भिडे गुरुजींच्या समर्थनार्थ असलेल्या बैठकीत हिंदुत्वनिष्ठ
सांगली : कोरेगाव भीमा प्रकरणात श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांचा काहीही संबंध नसतांना काही संघटना पू. गुरुजींना त्यात गोवण्याचा प्रयत्न करून त्यांच्यावर वृथा आरोप करत आहेत. या सर्वांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी समाजातील प्रत्येक घटक पू. भिडेगुरुजी यांच्या पाठीशी आहे. पू. गुरुजींच्या समर्थनार्थ २८ मार्च या दिवशी सांगलीत होणारा मोर्चा अभूतपूर्व करण्याचा निर्धार सर्व संघटनांनी केला. गुरुजींच्या समर्थनार्थ हरिदास भवन येथे सर्व संघटना, पक्ष, संप्रदाय, संस्था यांची एकत्रित बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी हा निर्धार व्यक्त केला.
प्रारंभी श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे कार्यवाह श्री. नितीन चौगुले यांनी एकूण कोरेगाव भीमा प्रकरणाचा घटनाक्रम सांगून मोर्च्याच्या आयोजनाचा प्रमुख उद्देश सांगितला. हा मोर्चा २८ मार्च या दिवशी नेमिनाथनगर येथील राजभती भवनपासून सकाळी १० वाजता चालू होईल, तरी अधिकाधिक संख्येेने प्रत्येकाने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. नितीन चौगुले यांनी या वेळी केले.
काही मान्यवरांची मनोगते
१. श्री. युवराज बावडेकर, नगरसेवक, भाजप : हिंदूंची एकजूट विरोधकांना खुपत आहे त्यामुळे हा प्रकार चालू आहे. या प्रकरणाचा राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न होत आहे. आम्ही सर्वजण सर्वशक्तीनिशी गुरुजींच्या पाठीशी उभे राहू !
२. श्री. मयुर घोडके, शिवसेना शहरप्रमुख : पूर्वीच्या काळापासून साधू-संत यांना त्रास सहन करावा लागला आहे. पू. गुरुजी हे सध्याच्या काळातील संतच आहेत. हिंदू समाजाला ‘हिंदु’ म्हणून संघटित करण्याचे गुरुजींचे काम असल्याने गुरुजींना लक्ष केले जात आहे.
३. श्री. संतोष देसाई : सर्व एकत्र आलेल्या हिंदूंचे अभिनंदन ! गुरुजींच्या विरोधात रचलेले हे षड्यंत्र आहेे. त्यासाठी हिंदू म्हणून एकत्र येणे काळाची आवश्यकता आहे.
उपस्थित मान्यवर
शिवसेनेचे नगरसेवक श्री. शेखर माने, नगरसेवक श्री. शिवराज बोळाज, काँग्रेसचे नगरसेवक प्रशांत-पाटील मजलेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक श्री. युवराज गायकवाड, माजी नगरसेवक श्री. सुब्राव मद्रासी, डॉ. अविनाश पाटील, श्री. नितीनकाका शिंदे, श्री. शशिकांत नागे, श्री. महेंद्र चंडाळे, शीख समाजाचे चरणसिंह धिल्लो, सर्वश्री सागर टिकारे, शितल सदलगे, मनोहर साळुंखे, लक्ष्मण मंडले, प्रकाश निकम, सूरज पाटील, लिंगायत समाजाचे श्री. शिवदेव स्वामीजी, माळी समाज विश्वस्त श्री. श्रीकृष्ण माळी, गोल्ला समाजाचे श्री. सचिन पवार, सातारा येथील श्री. आनंदराव जाधव, भाजपचे श्री. हणमंतराव पवार यांसह मोठ्या संख्येने विविध संघटनांचे प्रतिनिधी, कार्यकर्ते उपस्थित होते.
मोर्च्यासाठी पुष्पराज चौकात कार्यालय !
२८ मार्चला होणार्या मोर्चासाठी पुष्पराज चौकातील एअरटेलच्या कार्यालयाशेजारी संपर्क कार्यालय चालू करण्यात आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात
GOOD NEWS