जळगाव : बाजीराव-मस्तानी चित्रपटाद्वारे होणारे इतिहासाचे विकृतीकरण आणि तेलंगण शासन ख्रिस्ती धर्मियांचे करीत असलेले लांगूलचालन यांविरोधात येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. अनिल पवार यांनी हे निवेदन स्वीकारले. या निवेदनाद्वारे इतिहासाचे विकृतीकरण न वगळल्यास बाजीराव-मस्तानी चित्रपटावर बंदी घालण्यात यावी, तसेच तेलंगणा शासनाचा नाताळच्या निमित्ताने १९५ ख्रिस्ती चर्चसमवेत साजरा करण्यात येणारा कार्यक्रम आणि २ लक्ष ख्रिस्त्यांना कपडे वाटपाचा कार्यक्रम रहित करावा अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या प्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री अविनाश चव्हाण, श्रेयस पिसोळकर, आशिष गांगवे, रवि चव्हाण, शिवसेनेचे श्री. कपिल ठाकूर, सनातन संस्थेचे श्री. प्रीतम पाटील हे उपस्थित होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात