Menu Close

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी संस्थांतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी ! – भरतशेठ गोगावले

आमदार भरतशेठ गोगावले यांची पत्राद्वारे मागणी

आमदार भरतशेठ गोगावले

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहकारी संस्थांतील भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशा मागणीचे पत्र शिवसेनेचे रायगड येथील आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी सहकार विभागाचे शासनाचे सचिव, सहकारमंत्री, मुख्यमंत्री, विधी आणि न्याय विभागाचे सचिव यांना दिले. सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर ही गोष्ट हिंदु विधीज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार आमदार गोगावले यांनी यावर कार्यवाही करण्यासाठी शासनाकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. या पत्रासमवेत हिंदु विधीज्ञ परिषदेने दिलेली पुराव्याची कागदपत्रे जोडली आहेत.

पत्रात म्हटले आहे की,

१. ‘सह्याद्री काजू प्रक्रिया आणि मद्यार्क निर्मिती सहकारी कारखाना मर्यादित, खासकीलवाडा, तालुका सावंतवाडी, जिल्हा सिंधुदुर्ग’ या सहकारी संस्थेमध्ये सरकारची गुंतवणूक ३ कोटी ५५ लक्ष २० सहस्र रुपये इतकी आहे.

२. इतक्या मोठ्या रकमेची परतफेड करण्यासाठी संस्थेकडून तारण म्हणून १६० गुंठे भूमी पडवे-माजगाव येथील घेतली आहे. या भूमीच्या सात-बार्‍यावर आधीच सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (शाखा-कोलझर) यांच्याकडून एकूण २ कोटी ४५ लक्ष रुपयांचे कर्ज घेतल्यापोटी भूमी तारण असल्याची नोंद आहे. तारण ठेवलेल्या भूमीवरच पुन्हा कर्ज घेतलेले आहे.

३. हा एक घोटाळ्याचा भाग असून एकप्रकारे शासनाची केलेली फसवणूकच आहे. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात


श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्‍वस्तांनी लक्षावधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करावी !

आमदार भरतशेठ गोगावले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई : श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्‍वस्तांनी लक्षावधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करणे, तसेच न्यासातील घोटाळ्याची सखोल चौकशी करावी, असे मागणी पत्र शिवसेनेचे रायगड येथील आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधी आणि न्याय विभागाचे सचिव यांना नुकतेच दिले. सध्या चालू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर न्यासाच्या घोटाळ्याची माहिती हिंदु विधीज्ञ परिषद आणि हिंदु जनजागृती समिती यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यानुसार आमदार श्री. भरतशेठ गोगावले यांनी शासनाकडे पत्राद्वारे वरील मागणी केली आहे. या पत्रासमवेत त्यांनी हिंदु विधीज्ञ परिषदेने दिलेली पुराव्यांची कागदपत्रे जोडली आहेत.

त्या पत्रात म्हटले आहे की,

१. वर्ष २०१६ मध्ये न्यासाच्या केलेल्या पडताळणीत हिंदु विधीज्ञ परिषदेला काही धक्कादायक गोेष्टी आढळून आल्या. यामध्ये १ जानेवारी २०१५ ते ३१ ऑगस्ट २०१६ या कालावधीत न्यासाच्या विश्‍वस्तांनी जलयुक्त शिवार आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याच्या देणग्या संदर्भातील अभ्यास दौर्‍याच्या नावाखाली एकूण १२ लक्ष ९१ सहस्र २९१ रुपये इतका खर्च केला आहे. यामध्ये लॉजिंग, खानपान, प्रवास इत्यादी व्ययाचाही समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे श्री सिद्धिविनायक मंदिर कायदा विश्‍वस्तांना अशा व्ययाची अनुमतीच देत नाही. त्यामुळे विनाअनुमती अभ्यास दौर्‍यावर मंदिर विश्‍वस्तांनी केलेला व्यय नियमबाह्य आहे.

२. या प्रकरणी संबंधित विश्‍वस्तांवर फसवणूक आणि अफरातफर यांचे गुन्हे प्रविष्ट करून त्यांच्याकडून सर्व निधी वसूल करण्यात यावा.

३. गेल्या १० वर्षांतील श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाच्या कारभाराची प्रधान सचिव वा सचिव दर्जाच्या अधिकार्‍याकडून सखोल चौकशी करून त्यात दोषी आढळणार्‍यांवर कठोर कारवाई करावी.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *