Menu Close

पाकमध्ये परत पाठवण्यात येणार्‍या हिंदु शरणार्थींवर धर्मांतरासाठी दबाव

सिंध प्रांतात उद्या होणार ५०० हिंदूंचे धर्मांतर

  • रोहिंग्या मुसलमान आणि बांगलादेशी घुसखोर यांना हाकलू न शकणारे सरकार शरणार्थी हिंदूंना मात्र देशातून बाहेर जाण्यास भाग पाडत आहे ! हे सरकारला लज्जास्पद !
  • अदनान सामी यांच्यासारख्या पाकच्या गायकांना भारतीय नागरिकत्व बहाल करणारे सरकार पाकमधील हिंदु शरणार्थींना मात्र पुन्हा पाकमध्ये पाठवते, हे लक्षात घ्या !
  • यावरून हिंदु शरणार्थींच्या पुनवर्सनाचे सरकारकडून करण्यात आलेले दावे किती फोल आहेत, हे स्पष्ट होते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात

जोधपूर : राजस्थानहून पाकमध्ये पाठवण्यात येणार्‍या हिंदु शरणार्थींवर धर्मांतर करण्यासाठी दबाव निर्माण करण्यात येत आहे. जे हिंदू पाकिस्तान सोडून भारतात आले होते; परंतु काही कारणाने त्यांना पुन्हा पाकमध्ये जावे लागले, अशा कुटुंबांना तेथील इस्लामी नागरिक लक्ष्य करत आहेत. मागील ३ वर्षांत भारतात शरणार्थी म्हणून आलेल्या १ सहस्र ३७९ हिंदूंना पाकमध्ये जावे लागले आहे.

२५ मार्च या दिवशी सिंध प्रांतात ५०० हिंदूंचे धर्मांतर करण्यात येणार आहे. यासाठी सर्वत्र हस्तपत्रकेही वाटण्यात आली आहेत. ‘दैनिक भास्कर’ या वृत्तसंकेतस्थळाने हेे वृत्त प्रकाशित केले आहे.

हिंदु शरणार्थी कुटुंब पाकमध्ये पोहोचताच राजस्थान न्यायालयाचा त्यांच्या बाजूने निकाल

भारताने ५ ऑगस्ट २०१७ या दिवशी ८० वर्षीय चंदूल, त्यांची पत्नी धामी, मुलगा भगवान, सून धरमी आणि ४ नातवंडे या हिंदु कुटुंबाला पाकमध्ये पाठवण्याचा आदेश दिला. (शरणार्थी हिंदूंना पुन्हा पाकमध्ये पाठवणे, म्हणजे गोमातेला कसायांच्या हाती सोपवण्यासारखे आहे ! त्यामुळे आता समस्त हिंदूंनी शरणार्थी हिंदूंच्या मागे भक्कमपणे उभे रहाणे आवश्यक आहे ! हिंदूंनो, शरणार्थी हिंदू आपलेच बांधव आहेत, हे सरकार जरी विसरले असले, तरी आपल्याला विसरून कसे चालेल ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) राजस्थान उच्च न्यायालयाने सुट्टीच्या दिवशी विशेष सुनावणी घेऊन या कुटुंबाला परत पाकमध्ये पाठवण्याच्या आदेशाला स्थगिती दिली. हा आदेश देण्याच्या काही मिनिटे आधीच हे कुटुंब प्रवास करत असलेल्या आगगाडीने (रेल्वेने) पाकची सीमा ओलांडली होती. आता याच परिवारावर तेथे इस्लाम स्वीकारण्यासाठी प्रचंड दबाव टाकला जात आहे.

भारतात विस्थापित हिंदूंच्या पुनर्वसनाचे नियम जिल्हास्तरापर्यंत न पोहोचल्याचा हिंदु शरणार्थींना फटका

भारतातील हिंदु शरणार्थींसाठी लढा देणारे ‘सीमांत लोक संघटने’चे अध्यक्ष हिंदुसिंह सोढा याविषयी म्हणाले, ‘‘भारत सरकार शरणार्थी हिंदूंसाठी पुनर्वसनाचे नियम बनवते; मात्र ते जिल्हास्तरापर्यंत पोहोचत नाही. त्याचा फटका शरणार्थी हिंदूंना बसत असून त्यांना पुन्हा पाकमध्ये जावे लागून इस्लाममध्ये धर्मांतर करावे लागत आहे.’’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *