Menu Close

इसिसचे लक्ष्य होते बंगालमधील तारकेश्‍वर मंदिर ! – अटक करण्यात आलेल्या इसिसच्या आतंकवाद्याने दिली माहिती

हिंदूंनो, जिहादी आतंकवाद्यांनी भारताला इस्लामी देश करण्यापूर्वी जागृत व्हा !

कोलकाता : बांगलादेशाच्या सीमेवर असणारा बंगालही आता इसिसच्या रडारवर आला आहे. दुर्गापूरच्या गोपालपूर येथून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून अटक करण्यात आलेला इसिसचा आतंकवादी आसिफच्या चौकशीतून राज्यातील हुगळी येथील प्रसिद्ध तारकेश्‍वर मंदिरावर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता, असे उघडकीस आले आहे. (इसिसचे आतंकवादी राज्यात कारवाया करण्याचा प्रयत्न करत असतांना तृणमूल काँग्रेसच्या राज्यातील पोलीस झोपले आहेत का ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात) आसिफ दुर्गापूरच्या राजेंद्र अ‍ॅकेडमीमध्ये अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी होता. धनियाखाली (हुगळी) येथे रहाणारा आसिफ इंटरनेटच्या माध्यमातून सिरियातील इसिसच्या आतंकवाद्यांच्या संपर्कात होता. त्याने तारकेश्‍वर मंदिराची रेकी (अवलोकन) केली होती. तसेच मंदिराच्या प्रवेशद्वाराचा नकाशा बनवून तो सिरियातील इसिसच्या आतंकवाद्यांना पाठवला होता. आसिफला आतंकवादी जरीरने एक भ्रमणभाष संचही दिला होता.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *