Menu Close

पू. भिडेगुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना पूर्वग्रहदूषितपणे गोवले आहे ! – संतवीर बंडातात्या कराडकर

२८ मार्चला होणार्‍या मोर्च्यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन

श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांसमवेत २८ मार्चच्या मोर्च्याला पाठिंबा देतांना (१) संतवीर बंडातात्या कराडकर

पुणे : कोरेगाव भीमा येथे घडलेल्या दुर्घटनेशी दुरान्वयेही संबंध नसलेले पू. संभाजीराव भिडेगुरुजी आणि श्री. मिलिंद एकबोटे यांना पूर्वग्रहदूषितपणे या प्रकरणात गोवण्यात आले आहे. शासनाने या प्रकरणी सत्य पडताळून दंगल घडवणार्‍या खर्‍या दोषींवर कारवाई करावी. संघटनेच्या विशिष्ट कार्यामुळे कोणाला उत्तरदायी ठरवणे अयोग्य आहे. यासाठी पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या सन्मानार्थ २८ मार्चला होणार्‍या मोर्च्यात सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन वारकरी संप्रदायाचे संतवीर बंडातात्या कराडकर यांनी केले आहे. श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांनी संतवीर बंडातात्या कराडकर यांची भेट घेऊन चर्चा केली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *