हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांचा कर्नाटक दौरा
धारवाड (कर्नाटक) : हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी हुब्बळ्ळी आणि मुदिहाळ येथे हिंदुत्वनिष्ठ, धर्माभिमानी अधिवक्ते, हितचिंतक आणि व्यावसायिक यांना नुकतेच विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
हुब्बळ्ळी येथे हितचिंतक तथा व्यावसायिक यांना मार्गदर्शन
हुब्बळ्ळी येथे हितचिंतक तथा व्यावसायिक यांना मार्गदर्शन करतांना श्री. शिंदे यांनी ‘आनंदी जीवन जगण्यासाठी काय करावे ?’, ‘तणावरहित दैनंदिन व्यवहार किंवा व्यवसाय कसा करावा ?’, ‘जीवनातील समस्यांवर मात कशी करावी ?’ आदी विषयांवर उपस्थितांना मार्गदर्शन केले.
हुब्बळ्ळी येथे हिंदुत्वनिष्ठ युवकांना मार्गदर्शन
हुब्बळ्ळी येथील एका कार्यक्रमामध्ये हिंदुत्वनिष्ठ युवकांना मार्गदर्शन करतांना श्री. रमेश शिंदे यांनी हिंदु धर्मावर होणार्या आघातांविषयी माहिती दिली, तसेच ‘ही स्थिती पालटण्यासाठी संघटित होऊन हिंदु राष्ट्रासाठी कसे प्रयत्न करावे ?’, यांविषयीही सविस्तर मार्गदर्शन केले.
मुदिहाळ येथे अधिवक्त्यांना मार्गदर्शन
मुदिहाळ येथे अधिवक्त्यांना मार्गदर्शन करतांना श्री. शिंदे यांनी न्यायव्यवस्थेतील वाढत्या दुष्प्रवृत्ती आणि त्यावर मात करण्यासाठी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता यांविषयी मार्गदर्शन केले. यासमवेतच ‘हिंदु राष्ट्राची मागणी संवैधानिक कशी आहे ?’ यांविषयीही माहिती दिली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात