स्वतःच्या मुलालाही आतंकवादी बनण्यापासून रोखू न शकणारे पोलीस जम्मू-काश्मीरमधील आतंकवाद काय संपवणार ? – संपादक, दैनिक सनातन प्रभात
श्रीनगर : जम्मू-काश्मीरमधील पोलीसदलात कार्यरत असलेल्या एका पोलिसाचा तरुण मुलगा जैश-ए-महंमद या जिहादी आतंकवादी संघटनेत सहभागी झाला आहे. आबिद मकबूल भट असे या मुलाचे नाव असून तो मूळचा त्राल येथील रहिवाशी आहे. आबिदने सामाजिक प्रसारमाध्यमांवर एक छायाचित्र प्रसारित केले असून त्यात त्याने हातात एके-४७ रायफल घेतल्याचे दिसत आहे.
गेल्या काही दिवसांपासून त्राल भागातील अनेक तरुण आतंकवादाकडे वळले आहेत. पोलीस कर्मचार्याचा मुलगा आतंकवादी संघटनेत सहभागी होण्याची गेल्या ७ मासांतील ही दुसरी घटना आहे. ‘वाट चुकलेल्या’ तरुणांचे मन वळवण्याचा प्रयत्न सातत्याने करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी वर्ष २०१७ मध्ये पोलीस कॉन्स्टेबल गुलाम मोहिउद्दीन खांडे यांचा मुलगा फरदीन खांडे (वय १६ वर्षे) आतंकवादी संघटनेत सहभागी झाला होता. फरदीनने त्याच्या २ साथीदारांसह ३१ डिसेंबर २०१७ या दिवशी लेथपोरा आणि पुलवामा येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तळावर आक्रमण केले होते. यात फरदीनसह ३ आतंकवादीही मारले गेले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात