Menu Close

हिंदूंना भुलवण्याचे ख्रिस्त्यांचे नवीन उपद्व्याप !

१. हिंदूंच्या मनात येशू ख्रिस्ताविषयी प्रेम निर्माण करण्याचा ख्रिस्त्यांचा कुटील डाव !

अलीकडेच एका जिल्ह्यातील एका गावात येशू ख्रिस्ताच्या जीवनावर एक महानाट्य आयोजित करण्यात आले होते. त्याच्या निमंत्रणपत्रिकेतच ‘सर्व धर्मियांना आग्रहाचे निमंत्रण’ असे शीर्षक होते. मला सांगा, ‘आपण हिंदू ! कृष्णाच्या, साईबाबांच्या जीवनावर नाटक करतो, तेव्हा आपल्याला, ‘सर्वधर्मियांना आग्रहाचे निमंत्रण’ असे थोडेच लिहावेसे वाटते ? फार फार तर आपण ‘सर्वांना आग्रहाचे निमंत्रण’ असे लिहू. थोडक्यात सर्व प्रकरणात ‘हिंदूंनी हे नाटक पहायला येऊन येशूच्या प्रेमात पडावे’, हा भाग दिसत होता.

२. वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरून हिंदूंचे धर्मांतर करण्याचे ख्रिस्त्यांचे षड्यंत्र !

२ अ. हिंदूंच्या मनात ख्रिस्ती धर्माविषयी आपुलकी निर्माण व्हावी, यासाठी त्यांच्या परंपरांचा वापर ! : ‘जाऊन बघूया तरी, यांचे काय चाळे चाललेत ते’, म्हणून वेळ काढून नाटक बघायला गेलो. सायंकाळी ६.३० चे नाटक. संध्याकाळी ७.३० पर्यंत कशात काही नाही. स्टेजवर पिठाच्या गिरणीतील पट्ट्याचा आवाज येतो, तशा प्रकारचे एकसुरी संगीत चालू होते. प्रचंड अशुद्ध मराठीत काही मंडळी गाणे गात होती. त्यातला ‘येशू’ शब्द सोडून इतर बर्‍याचशा शब्दांचा अर्थबोध होत नव्हता. समोर १ सहस्र खुर्च्या मांडल्या असतांना जेमतेम दीड दोनशे मंडळी बसली होती. संध्याकाळी ७.३० ते ७.४५ या काळात कार्यक्रम एकदाचा चालू झाला. आता निःशुल्क कार्यक्रम म्हणजे अर्थातच प्रेक्षकांना पिळण्यासाठी प्रारंभी उद्घाटन, सत्कार, आभारप्रदर्शन आणि भाषणे यांची ही मोठी शृंखला ! कार्यक्रमाचा आरंभ दीपप्रज्वलनाने झाला. मान्यवरांचा सत्कार शाल आणि श्रीफळ देऊन झाला. हिंदूंच्या मनात ख्रिस्ती धर्माविषयी आपुलकी निर्माण व्हावी; म्हणून नवनवीन क्लृप्त्या शोधून काढणारे धूर्त ख्रिस्ती ही संधी कशी सोडतील ? नाहीतर त्यांच्यात कुठे आहे दीपप्रज्वलन आणि शाल-श्रीफळ ? केकवरच्या मेणबत्त्या फुंकून आरंभ करणे आणि शेवटी ‘शॅम्पेन’ हे गोंडस नाव असलेल्या मद्याची बाटली उघडून ते प्राशन करणे, ही त्यांची ‘संस्कृती’!

३. ख्रिस्त्यांच्या मतांसाठी त्यांना चुचकारणारे नतद्रष्ट हिंदु लोकप्रतिनिधी आणि जन्महिंदू !

ख्रिस्त्यांना चुचकारण्यासाठी नंतर वेळ आली, ती मान्यवरांच्या भाषणांची. मंचावर मतांसाठी भुकेलेले आणि प्रसिद्धीला हापापलेले राजकारणी अन् तथाकथित उच्चभ्रू अर्थातच बहुतांश हिंदू बसलेले होते. त्यांपैकी एकाने तर कहर केला. भाषणात म्हणतो कसा, ‘येशू ख्रिस्ताचे हे नाटक आपल्या गावात होत आहे, हा मी माझ्या जीवनातील भाग्याचा क्षण समजतो.’ आज आपले बहुसंख्य हिंदु बांधव ख्रिस्ती होत असतांना अशा कार्यक्रमांना विरोध करण्याऐवजी ही मंडळी आपले भाग्य उजळून घेत आहेत. काय म्हणायचे या कपाळ करंटेपणाला ? असे हिंदू आहेत; म्हणून आज मिझोराम, त्रिपुरा, नागालॅण्ड, मेघालय ही ईशान्येकडील राज्ये ख्रिस्तीबहुल झाली आहेत.

४. ख्रिस्ती धर्म स्वीकारल्यास आजार बरा होणार असल्याचा नाटकाद्वारे छुपा संदेश !

शेवटी एकदाचे नाटक चालू झाले. आता या नाटकाला ‘महानाट्य’ म्हणायचे तर ‘जाणता राजा’ या नाटकाला ‘महाकाय नाट्य’ म्हणावे लागेल. अर्थात फुकटात हे एवढेच मिळणार. बाकी अभिनय, मराठीचे उच्चार, नेपथ्य सर्वच बाबतीत ‘आनंदीआनंद’ होता. मराठीचा खून अगदीच सहन होईना म्हणून शेवटी उठून आलो. जाता जाता हिंदूंसाठी एक संदेश पहायला मिळाला. येशू कुठल्या तरी गावात जातो. तेथे लुळे, पांगळे, आंधळे येतात आणि येशूचा स्पर्श होताच लगेच बरे होतात. यातील छुपा संदेश, ‘आमच्याकडे या आणि सर्व आजारातून मुक्ती मिळावा !!’

– एक धर्माभिमानी

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *