Menu Close

हज यात्रेसाठी हवाई प्रवास भाड्यामधे केलेली भरघोस कपात त्वरित रहित करा ! – सौ. नम्रता शास्त्री, सनातन संस्था

नागपूर : केंद्र सरकारने हज अनुदान बंद केल्याचे दाखवून तेवढीच रक्कम विमान प्रवासात सवलत म्हणून देणे, हा हिंदूंच्या डोळ्यात धूळफेक करण्यासारखा प्रकार आहे. शासन एकीकडे अमरनाथ यात्रेकरूंची संख्या नियंत्रित करते आणि हज यात्रेकरूंची संख्या १ लाख ७५ सहस्र ५ करून गेल्या ७० वर्षांतील उच्चांक गाठते. केंद्र सरकारने हज यात्रेसाठी हवाई प्रवास भाड्यामधे केलेली भरघोस कपात त्वरित रहित करावी, असे प्रतिपादन सनातनच्या सौ. नम्रता शास्त्री यांनी केले. १७ मार्च या दिवशी येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन घेण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. या वेळी धर्मजागरणचे श्री. रमेश अग्रवाल, हिंदु जनजागृती समिती, सनातन संस्थेचे कार्यकर्ते यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.

या वेळी करण्यात आलेल्या अन्य मागण्या

१. भाग्यनगरमध्ये रोहिंग्या मुसलमानांच्या वसाहतीला दिलेली अनुमती त्वरित रहित करावी.

२. सिद्धीविनायक मंदिराच्या अर्पण निधीमध्ये भ्रष्टाचार करून देवनिधीवर डल्ला मारणार्‍या संबंधित विश्‍वस्तांवर फसवणुकीचे आणि अफरातफरीचे गुन्हे प्रविष्ट करावेत.

वरील मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. त्यांनी ‘‘पुढे योग्य ती कारवाई करू’’, असे आश्‍वासन हिंदुत्वनिष्ठांना दिले.

क्षणचित्रे

१. आंदोलनाच्या वेळी उपस्थित धर्मनिष्ठांनी उत्स्फूर्त घोषणा दिल्या.

२. अनेक धर्माभिमानी आणि नागरिक यांना या वेळी शासनाला देण्याच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या केल्या.

विशेष

नियोजित आंदोलन स्थळासाठी अनुमती मिळणार नाही, असे पोलिसांनी आदल्या दिवशी सांगितले होते; परंतु रात्री ‘तुम्ही आधी ठरलेल्या स्थळी आंदोलन घेऊ शकता’, अशी अनुमती त्यांच्याकडून मिळाली.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *