Menu Close

काँग्रेसकडून गेली ५० वर्षे मुसलमानांचा ‘व्होट बँक’ म्हणून वापर ! – जमाल सिद्दीकी, प्रदेशाध्यक्ष, भाजप अल्पसंख्यांक मोर्चा

भाजप अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी

जळगाव : गेली ५० वर्षे काँग्रेसने मुसलमान समाजाला विकासापासून वंचित ठेवून केवळ ‘व्होट बँक’ म्हणून त्यांचा वापर केला. आज सच्चर समितीच्या अहवालानुसार मुसलमान समाज हा दलित समाजापेक्षा अधिक मागासलेला असून त्याला सर्वस्वी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शासन उत्तरदायी आहे, असे विधान भाजप अल्पसंख्यांक मोर्चा प्रदेशाध्यक्ष जमाल सिद्दीकी यांनी केले. ते अल्पसंख्यांक संवाद यात्रेच्या स्वागतप्रसंगी बोलत होते.

ते पुढे म्हणाले, ‘ब्रिटीश शासनाच्या काळात मुसलमान समाजातील ३५ टक्के लोक शासकीय सेवेत होते, तो आकडा काँग्रेस शासनाच्या काळात २ टक्क्यांवर आला आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शासनाने आजपर्यंत मुसलमानांच्या मनात हिंदू आणि भाजप यांच्या विरोधात विष ओतण्याचे काम केले आहे.’

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *